शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनाच हवीय सिंचन घोटाळ्याची माहिती!

By admin | Updated: June 5, 2015 01:48 IST

बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांना शासनाकडूनच माहिती हवी आहे.

मुंबई : बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांना शासनाकडूनच माहिती हवी आहे. त्यासाठी त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत तसा अर्जही जलसंपदा विभागाकडे केला असल्याचे समजते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंचन घोटाळाप्रकरणी माजी मंत्र अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, दोन्ही माजी मंत्र्यांना चौकशीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात हजर न राहाता वकिलामार्फत आपले म्हणणे सादर करण्याची मुभा एसीबीने दिली आहे. त्यावरून बरीच उलट-सुलट चर्चा होत आहे. निवडणुकीपूर्वी सिंचन घोटाळ्यावरून रान उठवणाऱ्या भाजपा अजित पवारांना पाठिशी घालत असल्याचेही वृत्त आहे. अजित पवारांना या घोटाळ्याप्रकरणी अद्याप आरोपी बनविण्यात आले नसल्याने त्यांच्या एसीबी कार्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती करता येत नाही, असे एसीबीचे म्हणणे आहे. याबाबत एसीबीचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले, यांना विचारले असता ते म्हणाले, अजित पवार यांची नियमानुसार चौकशी सुरू आहे. त्यांना प्रश्नावलीही पाठविण्यात आली आहे. मात्र उत्तरे देण्यासाठी त्यांना काही माहिती हवी असून त्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केला आहे. त्यानंतर ते त्यांची माहिती आम्हाला देतील. त्यांचे म्हणणे सादर झाल्यानंतर सगळी माहिती न्यायालयापुढे सादर केली जाईल, असेही दीक्षित म्हणाले. राज्य सहकारी बँकेच्या चौकशीत देखील ज्या संचालकांना नोटीसा पाठवल्या आहेत त्यांना त्यांचे म्हणणे वकिलामार्फत मांडण्यास अडकाठी केलेली नाही, अशी माहिती सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)