शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पवार बोलतात ते करत नाहीत, करतात ते बोलत नाहीत - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 18, 2014 15:57 IST

शरद पवार काय बोलतात, ते कुणालाच कळत नाही आणि ते तसं करतही नाहीत. तसेच ते जे करतात ते बोलतही नाहीत असे उद्गार आज मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १८ - शरद पवार काय बोलतात, ते कुणालाच कळत नाही आणि ते तसं करतही नाहीत. तसेच ते जे करतात ते बोलतही नाहीत असे उद्गार आज मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. स्थिर सरकारसाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणा-या शरद पवारांनी मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असे उलट विधान आज केले, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पवारांना टोला लगावला आहे. सध्या कोण कुणाबरोबर आहे तेच स्पष्ट होत नसल्याने आपण विरोधातच बसणे पसंत करू असे ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये जे साटंलोटं चाललेलं आहे त्यामुळे जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि निवडणुका आल्या तर हा संताप मतपेटीत उतरेल असेही ठाकरे म्हणाले. सध्याचं राज्यातलं राजकारण इमर्जन्सी वॉर्डमध्ये असल्याचे ते म्हणाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत शिवसेना व भाजपाना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत, याबाबत बोलताना ते असं करत असतिल तर चांगलंच आहे, त्यात वाईट काय असं सांगताना परंतु असे प्रयत्न कुणी केलेले नाहीत असंही ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दिलेल्या भेटीमध्ये राजकारण बघू नये सांगत उद्धव ठाकरे यांनी काल अनेक लोक भेटायला आले होते असे म्हटले आहे.