शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पवारच कर्णधार

By admin | Updated: June 18, 2015 02:56 IST

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि प्रतिष्ठेचे बनलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अखेर शरद पवार यांनीच बाजी मारली.

रोहित नाईक , मुंबई गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि प्रतिष्ठेचे बनलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अखेर शरद पवार यांनीच बाजी मारली. १७६ मतांसह विजयी होत पवार सातव्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले. पवारांनी क्रिकेट फर्स्ट पॅनलचे उमेदवार डॉ. विजय पाटील यांचा ३४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत पवार - म्हाडदळकर गटाने १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवून एमसीएचे मैदानही जिंकले.एमसीएच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ३२९ पैकी ३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेची साथ मिळाल्याने विजय पाटील यांच्या रूपाने पवारांना एमसीएमध्ये २००१ नंतर प्रथमच तगडे आव्हान मिळाले होते. मात्र हे आव्हान मोडून काढत पवारांनी ‘कर्णधारपद’ कायम राखले. पाटील यांना १४२ मते मिळाली. उपाध्यक्षपदावर देखील पवार - म्हाडदळकर गटाचे दोन्ही उमेदवार माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (१९५) आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (१८३) यांनी बाजी मारली. त्यांच्यासमोर आव्हान उभे केलेल्या क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रताप सरनाईक (१२४) व माजी क्रिकेटपटू अ‍ॅबी कुरविल्ला (१२२) यांचा मोठा पराभव झाला. खजिनदारपदावर पवार - म्हाडदळकर गटाचे नितीन दलाल यांनी १८९ मते मिळवताना क्रिकेट फर्स्ट गटाच्या मयांक खांडवाला (१२९) यांचे आव्हान परतवले. त्याचवेळी सह-सचिवपदी पवार - म्हाडदळकर गटाच्या पी. व्ही. शेट्टी (१८५) यांच्यासह क्रिकेट फर्स्टच्या डॉ. उन्मेश खानविलकर (१५९) यांनी बाजी मारली. खानविलकर यांच्या रूपाने क्रिकेट फर्स्ट गटाने पदाधिकारी पदावर एकमेव जागा जिंकली. त्याचवेळी या पदासाठी उभे असलेले अनुभवी रवी सावंत (१४०) यांच्या रुपाने पवार - म्हाडदळकर गटाचा एकमेव पराभव झाला. तर क्रिकेट फस्टर्चे माजी क्रिकेट्पटू लालचंद राजपूत (१२९) यांना देखील पराभव पत्करावा लागला.कायर्कारीणी सदस्यपदाच्या ११ पैकी १० जागांवर पवार - म्हाडदळकर गटाने बाजी मारली. यामध्ये अरमान मलिक (२०५), विनोद देशपांडे (१९०), नविन शेट्टी (१८५), अरविंद कदम (१८३), पंकज ठाकूर (१८३), दीपक पाटील (१७९), श्रीकांत तिगडी (१६९), आलम शाह (१६५), रमेश वाजगे (१६३) आणि गणेश अय्यर (१६१) यांचा समावेश आहे. क्रिकेट फर्स्टकडून माजी क्रिकेट्पटू प्रवीण आमरे (१७०) एकमेव उमेदवार निवडून आले. तर पवार - म्हाडदळकर गटाचे केवळ दीपक मूरकर (१४९) यांचा पराभव झाला.शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजपा असा सामना निवडणुकीत पाहता आला. निवडणुकीमध्ये चार जण तांत्रिक कारणांमुळे मतदान करू शकले नाहीत. दोन जणांनी आजारी असल्याचे कारण देऊन मतदान केले नाही.क्रिकेटसाठी आम्ही एकत्र आलोसर्व विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. मुंबई क्रिकेटच्या भवितव्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि एकत्र काम करणार. आतापर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनध्ये महिलांना स्थान नव्हते. मात्र महिला प्रतिनिधींचा समावेश करण्यासाठी आम्ही घटनेत बदल करू. त्यासाठी विशेष एजीएम (वार्षिक सर्वसाधारण सभा) बोलवू. मुंबई महिला क्रिकेट संघाला आणखी सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करू. - शरद पवारगड आला पण सिंह गेला....एमसीएच्या पदादिकाऱ्यांच्या निवडणुकीत पवार - म्हाडदळकर गटाने वर्चस्व राखले असले तरी रवी सावंत यांच्या पराभवाने सर्व निराश झाले. यावर विजयी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, सावंत यांचा पराभव म्हणजे गड आला पण सिंह गेला असेच म्हणावे लागेल. ते जरी हरले असले तरी त्यांच्या अनुभवाचा आम्ही फायदा करून घेणार आहोत.हा क्रिकेटचाच विजय आहे. ज्यांनी या निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला त्यांचा पराभव झाला. आम्ही क्रिकेटसाठी एकत्र आलो आणि क्रिकेटलाच प्राधान्य देणार असल्याने आम्हाला यश आले. - आशिष शेलारमुंबईकरांसाठी काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. या संधीचे मी सोने करेन. मुंबई क्रिकेटला जुने दिवस पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. - दिलीप वेंगसरकरअध्यक्षशरद पवार

ुउपाध्यक्षदिलीप वेंगसरकर आशिष शेलार

खजिनदारनितीन दलाल संयुक्त सचिवडॉ. पी.व्ही. शेट्टीडॉ. उन्मेश खानविलकर

कार्यकारिणी सदस्यअरमान मलिक विनोद देशपांडे नवीन शेट्टी अरविंद कदम पंकज ठाकूर दीपक पाटील प्रवीण आमरे श्रीकांत तिगडी आलम शाहरमेश वाजगे गणेश अय्यर