एकाही खड्डय़ाशिवाय मंडप

By Admin | Updated: August 24, 2014 00:33 IST2014-08-24T00:33:19+5:302014-08-24T00:33:19+5:30

खड्डय़ांमुळे झालेले अपघात व रस्त्यांची होणारी दुर्दशा यांपासून सहकारनगर परिसरातील संजीवनी मित्र मंडळाने एकही खड्डा न खणता गणोशोत्सवासाठी मंडप उभारला आहे.

Pavilion without a single pole | एकाही खड्डय़ाशिवाय मंडप

एकाही खड्डय़ाशिवाय मंडप

पुणो : खड्डय़ांमुळे झालेले अपघात व रस्त्यांची होणारी दुर्दशा यांपासून सहकारनगर परिसरातील संजीवनी मित्र मंडळाने एकही खड्डा न खणता गणोशोत्सवासाठी मंडप उभारला आहे. त्यासाठी मंडळाने या वर्षी पहिल्यांदाच मंडपासाठी लोखंडी खांबाचा सांगाडाच तयार केला आहे. त्यासाठी मंडळाने अडीच लाख रुपये खर्च केला असला, तरी यापुढे पुढील काही वर्षे मंडळाला मंडपासाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही. तसेच, रस्त्यांवर खड्डेही होणार नसल्याने मंडळाने दुहेरी उद्देश साध्य केला आहे.
गणोशोत्सवामध्ये अनेक गणोश मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खोदून मंडप उभा केला जातो. त्यामुळे चांगला रस्ता उखडला जातो. गणोशोत्सवानंतर काही मंडळांकडून हे खड्डे चांगल्या पद्धतीने बुजविले जात नाहीत. परिमाणी, छोटे अपघात घडून पादचारी जखमी होण्याची शक्यता वाढते. या पाश्र्वभूमीवर, ‘लोकमत’ने खड्डेविरहित गणोशोत्सव साजरे करण्यासाठी मंडळांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सहकारनगर येथील संजीवनी मित्र मंडळ 45 वर्षापासून गणोशोत्सव साजरा करते. मागील वर्षार्पयत हे मंडळ मंडपासाठी रस्त्यावर खड्डे करीत होते. या वर्षी मात्र मंडळाने खड्डेविरहित उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे म्हणाले, ‘‘मंडपासाठी दर वर्षी किमान 2क् ते 22 खड्डे खणले जात होते. गणोशोत्सवानंतर ते बुजवले जायचे; मात्र पावसामुळे हे खड्डे पुन्हा उखडायचे. तसेच, विविध ठिकाणी खड्डय़ांमुळे होणारे अपघात पाहिले. याचा विचार करून यंदा खड्डेविरहित मंडप उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लोखंडी सांगडा उभा करण्याचे ठरले. त्यानुसार लोखंडी खांब, पट्टय़ांचा वापर करून 4क् फूट लांबी व 2क् फूट रुंदी या आकाराचा मंडप तयार करण्यात आला आहे. हा सांगाडा करताना एकही खड्डा घेण्यात आलेला नाही. दर वर्षी मंडप उभारणीसाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च यायचा.
 या वेळी हा खर्च अडीच लाख रुपयांर्पयत गेला. मात्र, लोखंडी मंडप कायमस्वरूपी वापरता येणार आहे. त्यासाठी दर वर्षी एवढा खर्च करावा लागणार नाही. तसेच मंडपाला चांगला आधार दिल्याने मजबुतीही आली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Pavilion without a single pole