शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या आगमन मार्गात खड्ड्यांचा अडथळा

By admin | Updated: August 28, 2016 18:50 IST

गणेश मंडळांना मूर्ती मंडळाकडे नेताना रस्त्यावर उखडलेल्या पेव्हर ब्लॉकचा सामना करावा लागतो

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28- शहर, उपनगरांसह राज्यभरात गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. अनेक सार्वजनिक मंडळांनी गणपतीच्या मूर्ती कार्यशाळेतून मंडळाकडे नेण्यासही सुरुवात केली आहे. गेल्या रविवारी बहुतेक मंडळांनी गणेशाच्या मूर्ती मंडळात नेल्या आहेत. तर आज गणपती आगमनाचा शेवटचा आठवडा असल्यानं उर्वरित गणेश मंडळांची गणपतीच्या मूर्ती नेण्याची लगबग सुरू आहे.

मात्र या गणेश मंडळांना मूर्ती मंडळाकडे नेताना रस्त्यावर उखडलेल्या पेव्हर ब्लॉकचा सामना करावा लागतो आहे. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर या खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे लालबाग परिसरातही वाहतूक काहीशी मंदावली आहे. पुलासह रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात पेव्हर ब्लॉक टाकून बुजवले असले तरी बुजवलेले हे खड्डे पुन्हा डोके वर काढताना पाहायला मिळत आहे. परिणामी अनेक गणेश मंडळांना कार्यशाळेतून मूर्ती मंडळात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर परिसरातल्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वीच दुरुस्त केलेला चिंचपोकळी ते लालबागमधल्या संपूर्ण रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. चिंचपोकळीच्या पुलावरही वाहतुकीची वर्दळ वाढलेली आहे.

लालबागला जाणारे तसेच आंबेडकर मार्गाने परळच्या दिशेला जाणारे वाहनचालक एन. एम .जोशी मार्गावरून ये-जा करतात. परंतु चिंचपोकळी पुलावरील पेव्हर ब्लॉक उखडल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.या उखडलेल्या रस्त्यांमुळे लालबाग सिग्नल ते भारतमातापर्यंत वाहतूक कोंडी होते आहे.