शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र उत्सवात ‘पानविड्या’चा प्रसाद!

By admin | Updated: October 9, 2016 21:56 IST

लक्षावधी भाविकांचे शक्तिपीठ असलेल्या घाटपुरी येथील जागृत जगदंबा देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी असते

अनिल गवई/ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 9 - लक्षावधी भाविकांचे शक्तिपीठ असलेल्या घाटपुरी येथील जागृत जगदंबा देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी असते. या उत्सवानिमित्त अश्विन शु. अष्टमीला जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पान विड्याचा (तांबूल) अनोखा प्रसाद दिल्या जातो.

तांबुलाचा नावीन्यपूर्ण प्रसाद मिळणारे घाटपुरी देवस्थान हे विदर्भातील एक महत्त्वपूर्ण देवस्थान असून, या प्रसादाच्या परंपरेला दोन दशकांचा इतिहास आहे. जागृत ज्योत म्हणून परिसरात आणि विदर्भाच्या कानाकोपऱ्यात घाटपुरी येथील जगदंबा देवीची महती आहे. या देवीच्या साक्षात्काराची प्रचिती आल्याने, घाटपुरी येथील जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात नि:शुल्क तांबूल वितरणाची परंपरा खामगाव येथील अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी १९९८ पासून सुरू केली. सुरुवातीला अतिशय अल्प स्वरूप या प्रसाद वितरणाचे होते; मात्र दिवसेंदिवस या प्रसादाची ख्याती दूरवर पोहोचत असल्याने, आता सुमारे २७ हजार पानांपासून (खाण्याची पाने) प्रसाद तयार केल्या जातो.

अश्विन शु. अष्टमीला रात्री ८ ते ११ च्या कालावधीत दूरवरून तसेच दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा प्रसाद दिल्या जातो. या प्रसादाच्या प्रसादाच्या वितरणासाठी अग्रवाल परिवाराकडून कोणतीही वर्गणी घेतली जात नाही, तथापि, आपल्या शक्तीनुरूप दान देणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेला तडा न देता, तो देईल तितक्याच रुपयांच्या साहित्याची प्रसादात अतिरिक्त वाढ करण्यात येते. तांबुलाचा प्रसाद वितरणासाठी पंकज अग्रवाल, पराग अग्रवाल, वरुण अग्रवाल, अंकित अग्रवाल, संजय केडिया आणि अग्रवाल परिवारातील सदस्य सहकार्य करतात. उपवासालाही चालतो पानविडा! जगदंबा देवीच्या मंदिरात वितरित केल्या जाणाऱ्या पानविड्याच्या प्रसादात खाण्याचे पान, सोप, सुपारी, लवंग, विलायची, चमन बहार, चटणी, गुलकंद आदी साहित्याचा वापर केल्या जातो. त्यामुळे हा प्रसाद उपवासालादेखील चालतो.

तसेच अष्टमीला उपवास सोडणारे भाविक या तांबुलाच्या प्रसादानेच उपवास सोडण्याची प्रथा आता येथे प्रचलित झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच या प्रसादाची तयारी केल्या जाते.

अष्टमीला पान विड्याच्या प्रसादाचे वाटप करण्याच्या परंपरेला १८ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या प्रसाद वितरणाचे अतिशय लहान स्वरूप होते. आता २७ हजार पाने आणि इतर साहित्याचा प्रसाद वितरित केल्या जातो. या प्रसादासाठी अनोखी श्रद्धा भाविकांमध्ये दिसून येते.- पंकज अग्रवाल सेवादायक,तांबूल प्रसाद