पंकजा मुंडेंना झेड दर्जाची सुरक्षा द्या - पोटभरे

By Admin | Updated: June 25, 2014 00:29 IST2014-06-25T00:29:15+5:302014-06-25T00:29:15+5:30

आमदार पंकजा मुंडे-पालवे यांना महाराष्ट्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा द्यावी अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.

Pankaja Mundena give Z-level security - Belly | पंकजा मुंडेंना झेड दर्जाची सुरक्षा द्या - पोटभरे

पंकजा मुंडेंना झेड दर्जाची सुरक्षा द्या - पोटभरे

>ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. २५ - दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांना महाराष्ट्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा द्यावी अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. 
मंगळवारी पोटभरे यांनी मंत्रालयात जावून राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांची शिष्टमंडळासह भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने असंख्य कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी भरून काढण्याची ताकद पंकजा मुंडे-पालवे यांच्यात आहे. मुंडे यांच्या अपघाती निधनाबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे पंकजा मुंडे-पालवे यांना पुरेशी सुरक्षा मिळणे गरजेचे आहे. पंकजा यांच्या सुरक्षेततेची खबरदारी म्हणून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात यावी असे पोटभरे यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे-पालवे यांच्या झेड दर्जाच्या सुरक्षासंबंधी योग्य तो निर्णय घेवू असे आश्वासन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली असल्याची माहिती पोटभरे यांनी दिली आहे.  यावेळी पोटभरे यांच्यासोबत रमण जायभाय, संजय भिंगारदेव, सचिन डोंगरे, असद सय्यद, विष्णू शेळके, खंडू मोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

Web Title: Pankaja Mundena give Z-level security - Belly