शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सत्ता परिवर्तनाद्वारे मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करूया - पंकजा मुंडे

By admin | Updated: August 28, 2014 16:04 IST

शेतक-यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणा-या, जनतेला पोकळ आश्वासने देणा-या सरकारला अंधारात लोटून मुंडे साहेबांचे सत्ता परिवर्तनाचे स्वप्न पूर्ण करूया असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

ऑनलाइन लोकमत
सिंदखेडराजा, दि. २८ - शेतक-यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणा-या, जनतेला पोकळ आश्वासने देणा-या सरकारला अंधारात लोटून मुंडे साहेबांचे सत्ता परिवर्तनाचे स्वप्न पूर्ण करूया, असे आवाहन पंकजा मुंडे- पालवे यांनी केले. बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे 'संघर्ष' यात्रेला सुरूवात करताना त्या बोलत होत्या. 
'सत्ताधा-यांनी अनेक आश्वासने दिली, मात्र ती पूर्ण झाली नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार कधी?' असा प्रश्न विचारत आता राज्यात सामान्य माणसाचे सरकार आणायचे आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यातील महिलांवरील अत्यांचारात वाढ होत आहे, गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, १०० गुन्ह्यांपैकी फक्त ९-१० गुन्ह्यांचीच नोंद होते. गुन्हेगारीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, असे सांगत राज्याची ही हालत करणा-या सरकारला सत्तेवरून हलवूया असे त्या म्हणाल्या. तसेच सत्तेवर आल्यावर सिंदखेडचा विकास करणार असे आश्वासनही त्यांनी दिले. 
' ज्यांनी मुंडेसाहेबांना जिवंतपणी यातना दिल्या, त्यांना मृत्यूनंतर साहेबांचा पुळका आलाय' अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली.