शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

पंकजा मुंडे नाहीत 'चौकीदार'; ट्विटरवर जुनंच नाव कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 4:10 PM

केंद्रासह राज्यातील भाजपा मंत्र्यांनी, नेत्यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला आहे.

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सोशल मीडियावरुन उत्तर दिलं. मोदींनी त्यांच्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार शब्द लावला. त्यानंतर भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी, खासदारांनी, नेत्यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला. मोदींच्या समर्थकांनीदेखील त्यांच्या नावापुढे हा शब्द जोडत त्यांना समर्थन दिलं. यानंतर ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. पंतप्रधान मोदींनी नावापुढे चौकीदार लावल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी लगेच ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी याचं अनुकरण केलं. राज्याच्या पातळीवरही हाच ट्रेंड दिसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला. भाजपाच्या इतर मंत्र्यांनीही हे कॅम्पेन फॉलो केलं. मात्र ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला नाही. 

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लावला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख,  महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, पर्यावरणमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आहे. मात्र पंकजा मुंडेंसह पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी त्यांच्यापुढे चौकीदार शब्द जोडलेला नाही.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा