शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंच्या नाराजीची पक्षाकडून दखल; लवकरच मिळणार आमदारकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 11:49 IST

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता

मुंबई: विधानसभा निवडणुकीपासून पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांचं भाजपाकडून राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यातल्या भाजपा नेत्यांमध्ये याबद्दल एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजपासून भाजपाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात पंकजा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. एप्रिलमध्ये विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून नावांची चाचपणी सुरू आहे. याशिवाय इच्छुकांचीदेखील मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपाकडे जास्त संख्याबळ असल्यानं त्यांना काही उमेदवारांना सहज विधान परिषदेवर पाठवता येतील. त्यामध्ये पंकजा यांचं आघाडीवर असल्याचं समजतं. विधानसभा निवडणुकीत बीडच्या परळी मतदारसंघात पंकजा यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी त्यांना पराभूत करत विधानसभा गाठली. या निवडणुकीत स्वकियांनीच दगाफटका केल्याची भावना निर्माण झाल्यानं पंकजा पक्षावर नाराज आहेत. त्या पक्षांतर करणार असल्याची चर्चादेखील सुरू होती. पक्षातल्या इतर नाराज नेत्यांसोबत त्यांनी भगवानगडावर समर्थकांचा मेळावादेखील घेतला. त्यात त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या याच नाराजीची पक्षानं दखल घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. ओबीसी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या त्या भाजपामधल्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. अनेक वर्षे आमदार आणि पाच वर्ष मंत्री म्हणून काम केल्यानं त्यांच्याकडे संसदीय कामाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा पक्षाला विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो, असं भाजपामधल्या नेत्यांना वाटतं. 

आजच्या महत्त्वाच्या बातम्या

शिक्षकांसंदर्भात केलेल्या 'त्या' विधानावरून इंदुरीकर महाराज पुन्हा वादात...तर सर्वात आधी मीच डिटेन्शन सेंटरमध्ये जाईन- मुख्यमंत्रीCoronavirus: ज्या व्यक्तीमुळे पसरला कोरोना, तो अखेर सापडलाशांततेच्या मार्गानं सीएएला विरोध करणारे गद्दार, देशद्रोही होत नाहीत- हाय कोर्ट

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसVidhan Parishadविधान परिषदDhananjay Mundeधनंजय मुंडे