शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:38 IST

देश सोडून जाताहेत की नाही, यावर पोलिसांची करडी नजर

मुंबई - पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परत गेले की नाही यावर पोलिसांची बारीक नजर असून प्रत्येक पोलिस ठाण्याला त्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. 

ते म्हणाले, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ पाकिस्तानला परत जावे लागेल.  राज्यात किती पाकिस्तानी नागरिक आहेत याची नावांसह यादी आमच्याकडे तयार आहे. निर्धारित वेळेत ते देश सोडून गेले की नाही याची शहानिशा केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत हे पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाहीत हे बघितलेच जाईल तरीही कोणी इथे राहिला असल्याचे निदर्शनास आले तर तत्काळ कारवाई केली जाईल. 

कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशांनुसारच ही कारवाई होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री    

बैठकीत गैरहजर उद्धवसेनेवर टीका उद्धवसेनेचा एकही नेता/ खासदार पहलगाममधील घटनेनंतर दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हता, याबद्दल फडणवीस यांनी एका प्रश्नात खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, देशावरील संकटसमयी राजकीय मतभेद बाजूला सारून सगळे एक होतात हा आपल्या देशाचा इतिहास आहे, पण त्याचे भान उद्धवसेनेला दिसत नाही, उलट त्यांचे नेते संवेदनशील विषयांवर वाटेल तसे बोलत आहेत. ‘विमानात कधी बसले नाही अशाही लोकांना आमच्या पक्षाने जम्मू-काश्मीरमधून विमानाने परत आणले, असे विधान शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले होते. त्यावर, म्हस्के यांचे विधान अयोग्यच होते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान