शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ आमच्या हक्काचा...

By admin | Updated: July 30, 2016 03:27 IST

‘विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशा जोरदार घोषणा देत भाजपाच्या विदर्भातील तब्बल २० आमदारांनी आज सभागृह आणि विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला.

मुंबई : ‘विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशा जोरदार घोषणा देत भाजपाच्या विदर्भातील तब्बल २० आमदारांनी आज सभागृह आणि विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला.स्वतंत्र विदर्भाच्या लोकसभेतील ठरावावरून सुरू असलेल्या गदारोळात शिवसेनेचे सुनील प्रभू, १०५ हुतात्म्यांचे बलिदान शिवसेना वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र हाणून पाडले जाईल आणि ज्यांना विदर्भ हवा आहे त्यांनी चालते व्हावे, असे म्हणू लागले. तेव्हा भाजपाचे हे आमदार अत्यंत आक्रमक झाले. चैनसुख संचेती, आशिष देशमुख, सुधाकरराव देशमुख, अनिल बोंडे, चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, सुधाकर कोहळे, डॉ. देवराम होळी, कृष्णा गजबे, संजय पुराम, विकास कुंभारे, समीर कुणावार, डॉ. मिलिंद माने यांच्यासह भाजपाचे २० आमदार पुढे सरसावले. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी त्यांनी सुरू केली. आम्हालाही बोलू द्या, असे म्हणत हे आमदार वेलमध्ये उतरले. गदारोळात कामकाज संपल्यानंतर हे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आले आणि त्यांनी ‘विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशी घोषणा दिली. त्यामुळे वातावरण तापले. (विशेष प्रतिनिधी)विदर्भ मुद्द्यावरून रावते अन् भाजपा आमदार भिडले‘महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू. विदर्भासाठी तुम्ही एवढे ओरडताहात तर मग आधी राजीनामे देऊन बाहेर पडा अन् मग खुशाल मागा, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुनावताच भाजपाचे विदर्भातील आमदार आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. काही क्षण दोघेही एकमेकांच्या दिशेने धावून गेले.रावते संतप्त होऊन बोलत असताना भाजपाचे आमदार रामचंद्र अवसरे (भंडारा) आणि चरण वाघमारे (तुमसर) यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली. ‘तुम्ही आमचे राजीनामे मागणारे कोण, आमचा पक्ष आमचे काय करायचे ते पाहून घेईल, असे अवसरे आणि वाघमारे यांनी सुनावले. शिवसेनेचे काही आमदार रावतेंच्या समर्थनार्थ धावल्याने दोन सत्तारूढ पक्षांमधील संघर्ष समोर आला. गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब झालेले असताना हा प्रकार घडला. रावतेंना आवरण्यासाठी तसेच भाजपा आमदारांना शांत करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मध्ये पडले. बाका प्रसंग ओळखून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही सत्तारूढ बाकांच्या जवळ येऊन सगळ्यांना समजावू लागले. काही मिनिटांत वातावरण शांत झाले.