शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या जिवाला कुटुंबाकडूनच धोका

By admin | Updated: October 2, 2015 03:55 IST

आमचे अपहरण झाले नसून घरच्यांनी केलेल्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून आम्ही स्वत:हून घर सोडून मुंबईला आलो

मुंबई : आमचे अपहरण झाले नसून घरच्यांनी केलेल्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून आम्ही स्वत:हून घर सोडून मुंबईला आलो. आमच्या दोघींच्या जीविताला कुटुंबापासूनच धोका आहे, असे सनातनच्या साधक प्रिया आणि प्रीती चौरसिया यांनी सांगितले. श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आय. जी. खंडेलवाल आणि सनातनचे वकील संजीव पुनाळेकर देखील उपस्थित होते. माझे अपहरण झाले, ही बातमी वाचून मला खूप दु:ख झाले. यामुळे आम्ही खंडेलवाल आणि पुनाळेकर यांच्या मदतीने जगासमोर येण्याचे ठरवले. पैशांसाठी माझे आई-वडील माझे नाव बदलून कोलकाता येथील उद्योगपतीच्या मुलाशी दुसरे लग्न करण्याची जबरदस्ती केल्यामुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतला, असे प्रीती चौरसियाने सांगितले. याच मुलींच्या अपहरणाची माहिती श्याम मानव यांनी दिली होती. प्रियाने त्याचा इन्कार करताना आमच्यांवर कोणत्याही प्रकारचे संमोहन झालेले नाही, असे स्पष्ट केले.मानव यांचे वय झाले आहे. ते टीआरपीसाठी आमची बदनामी करत आहेत. माझे कुटुंब त्यांच्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे, असा आरोप साधक डॉ. स्वाती यांनी केला. ----------आमची मुलगी ‘सनातन’मध्ये अडकलीमहेंद्र कांबळे ल्ल बारामतीगेल्या चार वर्षांपासून मुलगी डोळ्यासमोर नाही. त्यामुळे आम्ही पूर्णपणे खचलो आहोत. आमची मुलगी सुखरूप आमच्या घरी यावी, हीच इच्छा आहे, अशा शब्दांत सनातनची साधक शीतल हिच्या आईवडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.बारामती शहरातील शीतल ३ मार्च २०११ला घरातून बँकेत नोकरीला जाण्यासाठी बाहेर पडली. ती परत आलीच नाही. सनातनच्या आश्रमात ती अगोदर गोव्याला, आता पनवेलला आहे. तिचा फोन येत नाही. आम्ही फोन केला तर ठराविक संवाद साधल्यानंतर फोन बंद होतो. ती सुखरूप घरी यावी, हीच आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले. शीतलचे वडील बेकरीमध्ये काम करतात. आई २० वर्षांपासून घरगुती खानावळ चालवते. त्यांना तीन मुली आहेत. सनातनच्या बारामतीतील केंद्र प्रमुखाकडून ती गोव्याच्या रामनाथी आश्रमात असल्याचे समजले. ७ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास आश्रम गाठला. मात्र मुलीला परत द्या म्हटल्यावर गोव्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात आमच्याच विरुद्ध तक्रार करण्यात आली. सनातनच्या साधकांनी आम्हाला पोलीस कोठडीची हवा खायला लावली, असे तिच्या पालकांनी सांगितले.