शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला हवेत ‘हमारे दिन’; फसवेगिरी संपणार- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 03:14 IST

सध्याच्या अकल्याणकारी सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी केला.

पुणे : पाच राज्यांतील विधानसभांचे निकाल हेच सांगत आहेत, की जनतेला अच्छे दिनची फसवेगिरी नको आहे, तर हमारे दिन पाहिजे आहेत. सध्याच्या अकल्याणकारी सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी केला.एका कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यात आलेल्या भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह, माजी महापौर अंकुश काकडे त्यांच्यासमवेत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘हे सरकार सत्तेवर आले व देशाचे अकल्याणच सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ नाही. अनेक आरोप होऊनही ते त्याचे निराकरण करण्यासाठी तयार नाहीत. त्यांचे सरकार आले विकासाच्या मुद्द्यावर; पण साडेचार वर्षांत काहीच केले नाही व आता राममंदिराच्या मुद्द्यावर देशात धार्मिक, जातीय ध्रुवीकरण करत आहेत. जनतेने त्यांना ५ राज्यांमधून मतपेटीद्वारे उत्तर दिले आहे. लोकसभेच्या येत्या निवडणुकीतही जनता त्यांना उभे करणार नाही.’’तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, की भाजपातून तसेच त्यांच्या आघाडीतून आता अनेकजण बाहेर पडत आहेत. राष्ट्रवादीमधून तिथे गेलेल्यांना आता परतीची ओढ लागली आहे, असे भुजबळ म्हणाले. त्यांना पुन्हा पक्षात घेणार का, यावर त्यांनी याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगितले. पक्षाने आदेश दिला की कोणतीही निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालChagan Bhujbalछगन भुजबळcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीChhattisgarhछत्तीसगडMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान