शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

...नाहीतर लोक मारायला उठतील!

By admin | Updated: March 11, 2015 01:52 IST

महसूलमंत्री, कृषिमंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यातले, मात्र गेल्या काही महिन्यांत ३२७ आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत.

मुंबई : महसूलमंत्री, कृषिमंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यातले, मात्र गेल्या काही महिन्यांत ३२७ आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. शेतकरी आपल्या पोरीबाळींचं लग्न करायला तयार नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीने कामं केली नाहीत म्हणून ते विरोधात बसलेत, आम्हीही तसेच वागलो तर उद्या आम्ही तिकडे बसू... शेतकऱ्यांचा अंत पाहू नका... ज्या दिवशी शेतकऱ्यांत एकजूट होईल त्या दिवशी तुम्ही-आम्ही आमदार पुढे पळत सुटू आणि शेतकरी काठ्या घेऊन मारायला मागे पळतील... ती वेळ येऊ देऊ नका... असे खडे बोल शिवसेनेचे आ. गुलाबराव पाटील यांनी सरकारला ऐकवले.विधानसभेत भाजपा सदस्य डॉ. संजय कुटे आणि अन्य सदस्यांनी २९३ अंतर्गत अवकाळी पावसावर चर्चा घडवून आणली होती. त्यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, भाजपा-शिवसेनेचे सरकार आले खरे; पण अधिकारी आमच्याशीच राजकारण करू लागले आहेत. तहसीलदार आमचं ऐकत नाही. मदत मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना बाप जिवंत असल्याचे तीनतीन पुरावे मागतात. मतदारसंघात फिरताना लाज वाटते. शेतकऱ्यांना राजा म्हणता पण तो भिकारी झालाय. कोणी काय केलं हेच बोलत बसू नका, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिला नाहीत तर तुमचं आमचं काम आटोपलं असं समजा... अशा शब्दांत पाटील यांनी सरकारच्या डोळ्यांत अंजन घातले.शिवसेनेचे आ. अर्जुन खोतकर यांनी तर सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, दुधाचे भाव, धान्याचे भाव ठरवणारे तुम्ही कोण? जो पिकवतो त्याला ठरवू द्या... शेतकरी उद्ध्वस्त झालाय, ५० लाखांच्या संत्र्यांच्या बागा मोडून गेल्या, आघाडी सरकारने कापसाला ६ हजारांचा भाव दिला; तुम्ही निदान २०० रुपये तर जास्तीचे द्या. लोक आम्हाला बोलतात, काय तोंड घेऊन जायचं आम्ही लोकांकडे, असेही आ. खोतकर यांनी सुनावले.या चर्चेत भर टाकली ती भाजपाचे आशिष देशमुख यांनी. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात; पण सरकारी कर्मचाऱ्याने कधी आत्महत्या केल्याची बातमी तुम्ही वाचली का? हे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे तरी ठरवा. खासदार, आमदारांनी एक वर्षाचा भत्ता आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी द्यावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.