शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

सरकार अन् भाजपात समन्वयासाठी ओएसडी

By admin | Updated: October 1, 2015 03:21 IST

राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात समन्वय राखण्यासाठी आता मुख्यमंत्री

मुंबई : राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात समन्वय राखण्यासाठी आता मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजपासून कामकाज सुरू केले. सरकार आणि भाजपात समन्वय नसल्याची ओरड सातत्याने होत होती. कोल्हापुरात झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या दोहोंमध्ये समन्वयाची स्थायी व्यवस्था असली पाहिजे, असा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर, पक्षाबरोबरच संघाशीही संपर्क ठेवून या दोन्हींची मते सरकारला कळविणे आणि सरकारला असलेल्या अपेक्षा पक्ष संघटनेला कळविणे अशी दुहेरी जबाबदारी भारतीय यांच्यावर असेल. मुख्यमंत्री कार्यालय आणि इतर मंत्री कार्यालयांमध्ये समन्वयाचे कामदेखील त्यांच्याकडे असेल, असे समजते. श्रीकांत भारतीय हे अमरावतीचे असून भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आलेले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणेचे समन्वयक होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री तावडे यांचे जवळचे मित्र तसेच केंद्रीय मंत्री गडकरी आणि वित्त मंत्री मुनगंटीवार यांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे. (विशेष प्रतिनिधी)