शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय शेती हद्दपार !

By admin | Updated: May 28, 2014 23:36 IST

कृषी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंगरूळपीर : अल्प खर्चात भरघोस उत्पन्न मिळावे आणि दर्जेदार उत्पादित पीक मिळावे या उदात्त हेतूने शासनाने मागील सहा वर्षापूर्वी शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीवर भर द्यावा या संदर्भात गावोगावी जनजागृती अभियान राबविले होते. मात्र अलीकडच्या काळात कृषी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीच्या अतोनात खर्चामुळे शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येचे कारण लक्षात घेऊन शासनाने जनजागृती अभियानाचा उपक्रम हाती घेवून गावोगावी जाऊन शेतकर्‍यांना सेंद्रीय शेती फायदेशीर आहे याचे महत्व पटवून दिले. एवढेच नव्हे तर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रत्येक शेतकर्‍याने अल्प खर्चात भरघोस उत्पन्न देणार्‍या सेंद्रीय शेतीवर विशेष भर देण्यात आला होता. वारंवार रासायनिक व कीटकनाशकांचा वापर केल्याने जमिनीची पोत बिघडून जमीन बंजर होते. त्यामुळे सेंद्रीय शेतीचे अनेक फायदे लक्षात घेऊन तालुक्यातील गणेशपूर, पोटी, चांभई, कासोळा, तर्‍हाळा, येडशी, बेलखेड, मसोला, धोत्रा, घोटा, मंगळसा, वनोजा, खरबी या गावातील बहुतांश शेतकर्‍यांनी पुढाकार घेऊन सेंद्रीय शेती करण्याकडे कल वाढविला होता. यामध्ये विशेषत: कापूस, सोयाबीन, गहु, हरभरा आदी पीके सेंद्रीय पद्धतीने घेण्यात आली होती. विशेष म्हणजे तत्कालिन जिल्हाधिकारी करवंदे यांचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी गणेशपूर येथील शेतकर्‍यांनी सेंद्रीय पद्धतीने कापूस पीकविला होता. तेव्हा तेथील शेतकर्‍यांना बजारपेठेतील मूल्यापेक्षा ८00 रूपये जास्त दराने भाव मिळाला होता. सेंद्रीय शेतीला पुरक म्हणून अनेक गावामध्ये गांढूळ खत प्रकल्प देण्यात आले होते. यामधील गांडूळखताचे प्रकल्प बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. यामध्ये कृषी अधिकार्‍याचे व शेतकर्‍याचे सातत्य नसल्यामुळे सद्यस्थितीत सेंद्रीय शेती तालुक्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबीला अधिकार्‍यांची उदासीनता कारणीभूत ठरत असली तरी काही शेतकर्‍यांच्या मते सेंद्रीय शेतीच्या मालाला जवळपास बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे सेंद्रीय शेती करण्याचे शेतकरी टाळत असल्याचे दिसून येते.