धनगर आरक्षणाला विरोध

By Admin | Updated: June 1, 2015 05:16 IST2015-06-01T05:16:38+5:302015-06-01T05:16:38+5:30

महाराष्ट्रातील धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण लागू करण्याच्या मागणीस पाठिंबा देणाऱ्या राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने प्रत्यक्षात या प्रस्तावाला पाठिंबाच

Opposition to Dhanagar reservation | धनगर आरक्षणाला विरोध

धनगर आरक्षणाला विरोध

मुंबई : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण लागू करण्याच्या मागणीस पाठिंबा देणाऱ्या राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने प्रत्यक्षात या प्रस्तावाला पाठिंबाच दिलेला नाही, असा गौप्यस्फोट केंद्रीय आदिवासी विकासमंत्री यू.एल. ओराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. यामुळे धनगर समाजात तीव्र संपात व्यक्त करण्यात येत असून, फडणवीस सरकारची पंचाईत झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चर्चगेट येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी केंद्रीयमंत्री ओराम यांचे १४ मे २०१५ रोजीचे पत्र मीडिया प्रतिनिधी व उपस्थितांंना दाखवून मोदी सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: Opposition to Dhanagar reservation