शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कांदा व्यापार्‍यांचा बंद मागे; आजपासून लिलाव

By admin | Updated: June 18, 2014 14:05 IST

पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या आश्‍वासनानंतर जिल्ह्यात दोन दिवसांपासून व्यापार्‍यांनी सुरू केलेला बंद मागे घेतला आहे.

 

नाशिक: पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या आश्‍वासनानंतर जिल्ह्यात दोन दिवसांपासून व्यापार्‍यांनी सुरू केलेला बंद मागे घेतला आहे. चर्चेअंती आहे त्या परिस्थितीत कामकाज सुरू करण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला असल्याने जिलतील सर्व बाजार समित्यांचे लिलाव उद्यापासून नियमितपणे सुरू होत आहेत; मात्र १0 जुलैपर्यंत लेव्हीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली न काढल्यास ११ जुलैपासून पुन्हा लिलाव बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
लेव्हीचे वाढविण्यात आलेले दर, सर्व बाजार समित्यांतील तफ ावत व पणन मंडळाच्या वतीने 'नो वर्क, नो वेज' याबाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकावरून संतप्त होत जिलतील कांदा व्यापार्‍यांनी जिलतील सर्व १४ बाजार समित्यांमधील लिलाव सोमवारपासून बंद केले होते. याबाबत आज जुना आग्रारोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात पणन मंडळाचे अधिकारी, व्यापारी प्रतिनिधी, माथाडी नेते, कामगार उपआयुक्त, बाजार समितीचे पदाधिकारी यांची बैठक होऊन यावर चर्चा झाली. व्यापारी प्रतिनिधी सोहनलाल भंडारी व नंदकुमार डागा यांनी लेव्ही प्रश्नावरून व विविध बाजार समितीत असलेल्या वेगळ्या दरांबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हा निबंधक कार्यालयाच्या वतीने 'नो वर्क, नो वेज'बाबत परिपत्रक काढले असून, याची अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी अडचणीत आले असल्याने हा बंद पुकारण्यात आल्याचे सांगितले. 'प्रथम हे प्रश्न सोडवा, मगच लिलाव सुरू करू', अशी भूमिका त्यांनी घेतली. या संपामध्ये माथाडी कामगारांचा समावेश नाही. यामध्ये कामगारांचे नाव घेतले जात आहे याचा निषेध कामगार प्रतिनिधींनी केला. व्यापारी तसेच माथाडी कामगार केवळ आपले हित पाहत आहेत. 
कांद्याचे बाजार वाढले नाही; मात्र लेव्ही वाढत आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागते त्यांचा विचार करावा, अशी भूमिका आमदार शिरीष कोतवाल व दिलीप बनकर यांनी मांडली.
पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १३ जूनलाच सर्वांची बैठक घेत सर्व बाजार समित्यांमधील सर्व प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले आहे. परंतु चार दिवसांतच व्यापर्‍यांनी लिलाव बंद करणे चुकीचे असल्याचे सांगत पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे यांनी नाराजी व्यक्त केली. लेव्हीसह सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला १0 जुलैपर्यंत मुदत देण्याची विनंती त्यांनी केल्यानंतर अखेर व्यापार्‍यांनी आहे त्या परिस्थितीत लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीला आमदार शिरीष कोतवाल, आमदार दिलीप बनकर, नाशिक पणन मंडळाचे उप सहव्यवस्थापक सी. एम. बारी, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, सहकामगार आयुक्त के.व्ही. दैफ ळकर, माथाडी बोर्ड निरीक्षक पी.एस. सोनवणे, पी. एच. चव्हाण, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस प्रकाश शिंदे, सुनील यादव, कृष्णा जगदाळे आदि उपस्थित होते.
 
कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व बाजार समित्यांची पाहणी पणन मंडळाच्या समितीच्या वतीने करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसांत शासनाला याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. यानंतर लेव्ही व बाजार समित्यांचे इतर प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येणार आहेत. यामुळे आता व्यापारी किंवा कामगार अशा कोणत्याही घटकाने संप पुकारून शेतकर्‍यांचे नुकसान करू नये. 
- मिलिंद आकरे, 
कार्यकारी संचालक, पणन मंडळ, पुणे