सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळतोय उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 02:24 PM2019-10-15T14:24:10+5:302019-10-15T14:25:39+5:30

निर्यात बंदीनंतरही दर टिकून; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांनाही मागे टाकले

Onion is getting higher rates in Solapur Market Committee | सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळतोय उच्चांकी दर

सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळतोय उच्चांकी दर

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्यात बंदीनंतर राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वरचेवर वाढत आहे सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत कांद्याला उच्चांकी (सर्वाधिक) दर मिळत आहेकांद्याचे सर्वाधिक उत्पादन व विक्री करणाºया नाशिक जिल्ह्यालाही सोलापूर बाजार समितीने दराबाबत मागे टाकले

अरुण बारसकर 

सोलापूर :  निर्यात बंदीनंतर राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वरचेवर वाढत आहे.  असे असले तरी दर मात्र स्थिर असल्याचे दिसत आहे. सध्या सोलापूरबाजार समितीमध्ये राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत कांद्याला उच्चांकी (सर्वाधिक) दर मिळत आहे.  कांद्याचे सर्वाधिक उत्पादन व विक्री करणाºया नाशिक जिल्ह्यालाही सोलापूर बाजार समितीने दराबाबत मागे टाकले आहे.

राज्यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणा, चांदवड, कळवण या प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी अथवा साठवणुकीच्या कांद्याची विक्री  मोठ्या प्रमाणावर होते. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर बाजार समिती कांदा विक्रीत आघाडीवर असतात. राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही कांद्याची आवक व विक्री होते; मात्र त्याचे प्रमाण कमी असते तसेच सतत वर्षभर कांद्याचे लिलाव होत नाहीत. सप्टेंबर महिन्यात कांद्याची आवक कमी होऊ लागल्यानंतर दर वाढीला सुरुवात झाली. 

क्विंटलला ८०० ते १००० रुपये असलेला दर पाच हजारांच्या दरम्यान विक्री होऊ लागला. आवक कमी व कांद्याचे दर वरचेवर वाढू लागल्यानंतर केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी घातली. याचा परिणाम दराची घसरण होईल असे वाटत होते मात्र दर स्थिर राहिल्याचे आकडेवारीवरुन दिसून  येते. 

या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ३९०० रुपये दर मिळाला आहे. तर सोलापूर बाजार समितीमध्ये क्विंटलला ४३५० रुपयांचा दर मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीतही नाशिक   जिल्ह्यातील बाजार समित्यापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

यावर्षीचा उच्चांकी दरही सोलापुरातच..
- सप्टेंबर महिन्यातील तिसºया आठवड्यात राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. या आठवड्यात सोलापूर बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक  ५ हजार ३२५ रुपये, लासलगावला ५ हजार १०० रुपये, उमराणा व  पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रत्येकी ४ हजार ८०० रुपये, कळवण बाजार समितीत ४ हजार ७६५ रुपये तर  चांदवड बाजार समितीत क्विंटलला ४ हजार ९०० रुपये दर मिळाला होता. यावर्षीचे हे उच्चांकी दर आहेत. 
च्आॅक्टोबरमध्ये लासलगाव बाजार समितीत प्रतिक्विंटलला ३४५२ ते ३,८२५ रुपये, उमराणा बाजार समितीत ३२४० पासून ३८०० रुपये, पिंपळगाव बाजार समितीत ३४५५ ते ३८११ रुपये, कळवण बाजार समितीत ३३०० ते ३९०० रुपये  तर सोलापूर बाजार समितीत ४१५० ते ४३५० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. हे सर्वाधिक दर आहेत. 

सोलापूर बाजार समितीत शनिवारी (१२ आॅक्टोबर) १५ हजार १४३ क्विंटल कांद्याची आवक व विक्री झाली. सर्वाधिक ४,२७५ रुपयाने कांदा विकला. शुक्रवारी (११आॅक्टोबर) ९ हजार १५९ क्विंटलची विक्री झाली. सर्वाधिक  ४,३५० रुपये दर मिळाला. राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक दर मिळत आहे. 
- श्रीशैल नरोळे
उपसभापती, 
सोलापूर बाजार समिती 

उशिरा पाऊस झाल्याने कांद्याची लागवड मागील १५ दिवसापासून सुरू आहे. यामुळे आमच्या भागातील कांदा विक्रीसाठी येण्यास अवधी लागणार आहे. सध्या कांद्याला भाव असला तरी आमचा कांदा बाजारात येईपर्यंत दर टीकेलच असे नाही. दोन-तीन हजाराने कांदा विक्री झाला तरी शेतकºयांना परवडते.
- भारत जगदाळे, कांदा उत्पादक शेतकरी

Web Title: Onion is getting higher rates in Solapur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.