शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा घसरला !

By admin | Updated: February 25, 2016 03:15 IST

येथील बाजार समितीत कांद्याच्या भावात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल भावात क्विंटलमागे तब्बल ११० रुपये घसरण झाली. मंगळवारी ९९४ रुपये असलेला कमाल

लासलगाव : येथील बाजार समितीत कांद्याच्या भावात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल भावात क्विंटलमागे तब्बल ११० रुपये घसरण झाली. मंगळवारी ९९४ रुपये असलेला कमाल भाव बुधवारी ८५० रुपयांवर आले. बुधवारी बाजार समिती आवारात ७५० वाहनांतून कांद्याची आवक झाली. कमाल दर ३५० ते ८५० रुपये तर सर्वसाधारण भाव ७०० रुपये होते. परराज्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण होऊन एप्रिल २०१५ नंतर प्रथमच कांद्याचे दर क्विंटलमागे एक हजार रु पयांपेक्षा कमी झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लाल कांद्याची तिपटीने लागवड झाली होती. जिल्ह्यात दोन महिने पाऊस उशिरा झाल्याने लाल कांद्याची आवक उशिरा झाली. त्यातच गुजरात आणि कर्नाटकमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत जिल्ह्यातील कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. तोट्यातच कांदा विक्रीकांद्याचे भाव ५ डिसेंबरपर्यंत टिकून होते. मात्र त्यानंतर भाव घसरण्यास सुरु वात झाली. २७ जानेवारीपर्यंत १,१०० रुपयांपर्यंत सरासरी भावाने कांदा विक्र ी होत होती.२८ जानेवारीपासून भावात घसरण होत कांदा ८५० रु पयांपर्यंत खाली आला आहे. उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ९०० रु पयापर्यंत येत असून वाहतुकीवर १०० रु पये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे २५० रु पये नुकसान होत आहे. सप्ताहात लाल कांद्याची ८४,४३८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव ४०० ते १,१३१ रु पये एवढे राहिले, तर सरासरी ७५० रुपये होते. उन्हाळ कांद्याची ११२ क्विंटल आवक होऊन बाजारभाव ६६१ ते १०८१ रुपये, तर सरासरी ९०५ रुपये प्रतिक्विंटल राहिले.