शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कांद्याने आणला ट्रॅक्टरला '' भाव '' : नाशिकमध्ये एकाच दिवशी अडीचशे ट्रॅक्टरची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 7:00 AM

नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे निमित्त साधून अडीचशे ट्रॅक्टरची खरेदी केली गेली आहे...

ठळक मुद्देकांद्याला चार आकडी दर मिळाल्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या वाहनांची खरेदी मंदावल्याचीही चर्चागेली पाच वर्षे कांद्याचा सरासरी प्रतिक्विंटल दर १०० ते पाचशे रुपये राहिला

पुणे : ऑटोमोबाईल इंडस्ट्री मंदीतून जात असल्याची ओरड होत असतानाच नाशिकमधील एका तालुक्यातून एकाच दिवशी तब्बल अडीचशे ट्रॅक्टरची विक्री झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कांद्याला क्विंटलमागे चार अंकी किंमत मिळाल्याने ट्रॅक्टरच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात ही घटना घडली आाहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे निमित्त साधून अडीचशे ट्रॅक्टरची खरेदी केली गेली आहे. जवळपास वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरला मंदीने ग्रासले आहे. दुचाकीसह चारचाकी वाहनांची खरेदी देखील सातत्याने घटत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत होते. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन दिल्याने पेट्रोल-डिझेलच्या वाहनांची खरेदी मंदावल्याचीही चर्चा सुरु झाली होती. अखेरीस केंद्र सरकारला पेट्रोल-डिझेलची वाहने इतक्यात हद्दपार होणार नाहीत, असे जाहीर करावे लागले. उद्योगांना देखील अनेक सवलती जाहीर कराव्या लागल्या. गेली पाच वर्षे कांद्याचा सरासरी प्रतिक्विंटल दर १०० ते पाचशे रुपये राहिला आहे. मात्र, या वर्षामध्ये जवळपास दोन महिने कांद्याला क्विंटलमागे दोन हजार ते ४ हजार रुपयांदरम्यान दर मिळाला. किरकोळ बाजारात कांद्याचे प्रतिकिलो दर ६० रुपयांच्या घरात गेले होते. त्यामुळे यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या खिशात चांगली रक्कम पडली आहे. सध्या देखील घाऊक बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल १५०० ते ३ हजार रुपये मिळत आहे. आता कांद्याचा नवीन हंगाम सुरु होत आहे. देशातील कांद्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याचे सांगण्यात आले. वाहन क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते कळवण तालुक्यात एकाच दिवश अडीचशे ट्रॅक्टरसह २१ चारचाकी आणि चारशे ते पाचशे दुचाकी विकल्या गेल्या. जवळपास ३० कोटी रुपयांची उलाढाल एकाच दिवशी झाली. त्यातील ७० टक्के रक्कम ही रोख भरली गेली. त्यामुळे वाहन कंपन्यांचे अनेक वरीष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना वाहन हस्तांतरीत करण्यासाठी उपस्थित राहिले. तसेच, खरेदीदार शेतकऱ्यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात येत होते. ------------------------

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीonionकांदाMarketबाजारAutomobileवाहनCentral Governmentकेंद्र सरकार