शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

एकरकमी एफआरपी होणार हद्दपार..! शुगरकेन अ‍ॅक्टचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 6:38 PM

एफआरपीवरुन कारखान्यांवर पडत असलेला आर्थिक भार लक्षात घेऊन कारखान्यांनी शेतकऱ्यांशी करार करण्यास सुरुवात केली आहे. 

ठळक मुद्देकाही कारखान्यांनी केले एफअरपीचे तुकडा करारसाखरेला उठाव नसल्याने बहुतांश कारखान्यांची एफआरपीची रक्कम थकीतशुगर केन कंट्रोल अ‍ॅक्ट नुसार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम १४ दिवसांत देणे बंधनकारक एफआरपीसाठी शेतकऱ्यांशी करार करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या १७ वरुन २८ पर्यंत एक मार्च अखेरीस ८३७.७२ लाख टन उसाचे गाळप

पुणे : गेली अनेक वर्षे कायद्याच्या पुस्तकात बंद असलेले उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराचे (एफआरपी) हत्यार कारखानदारांच्या हाती गवसले आहे. त्यामुळे पुढील हंगामापासून एकरकमी एफआरपी काळाच्या पडद्याआड जाण्याची दाट शक्यता आहे. एफआारपीचा भार कमी करण्यासाठी हंगाम निम्मा संपल्यानंतर आल्यानंतर साखर कारखान्यांनी एफआरपी तीन टप्प्यात देण्यासाठी शेतकऱ्यांशी करार करण्यास सुरुवात केली आहे. अशा कारखान्यांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे. राज्यात यंदाच्या हंगामात १९३ साखर कारखाने सहभागी झाले आहेत. या कारखान्यांनी एक मार्च अखेरीस ८३७.७२ लाख टन उसाचे गाळप केले असून, ९२.५० लाख टन साखर उत्पादित केली आहे. साखरेला उठाव नसल्याने बहुतांश कारखान्यांची एफआरपीची रक्कम थकीत होती. शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारीच्या गाळपा नुसार १२ हजार ९४९ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. यातील पावणेआठ हजार कोटी रुपयांची रक्कम जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात देण्यात आली आहे. मात्र, अजूनही ४ हजार ८६४ कोटी ९७ लाख रुपये थकीत आहेत. शुगर केन कंट्रोल अ‍ॅक्ट नुसार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे. अन्यथा कारखान्यांना १५ टक्के व्याजासह ही रक्कम द्यावी लागते. बहुतांश कारखाने उसाची रक्कम देण्यास असमर्थ ठरल्याने त्या विरोधात शेतकरी संघटनांनी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात तीव्र आंदोलन केले होते. ऊस नियंत्रण आदेश १९६६च्या कलम ३ नुसार ऊस पुरवठादार शेतकऱ्यांबरोबर वैयक्तिक करार केला नसल्यास, कारखान्यांना १४ दिवसांत एफआरपी द्यावी लागते, असे निदर्शनास आले. अनेकांना या तरतुदीची माहितीच नव्हती. त्यामुळे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कारखान्यांनी करार केले होते. तर, काही कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत तसा ठराव केला होता. एफआरपीवरुन कारखान्यांवर पडत असलेला आर्थिक भार लक्षात घेऊन कारखान्यांनी शेतकऱ्यांशी करार करण्यास सुरुवात केली आहे. काही कारखाने ऊस गाळपासाठी कारखान्यात आल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीची ७५ टक्के रक्कम आत्ता मिळावी आणि उर्वरीत रक्कम बैलपोळा आणि दिवाळीच्या वेळी समान हप्त्यात मिळावी असा करार करीत आहेत. या स्थितीमुळे एफआरपीसाठी शेतकऱ्यांशी करार करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या १७ वरुन २८ पर्यंत पोहोचली आहे. पुढील हंगामात एफआरपी देण्याची हीच पद्धत रुढ होण्याची दाट शक्यता असल्याचे साखर क्षेत्रात बोलले जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार