शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’वर बंदीसाठी एक लाख सह्यांची मोहीम

By admin | Updated: September 21, 2015 00:34 IST

पुरोगामी संघटना : शिवाजी चौकात जोरदार निदर्शने, घोषणाबाजी

कोल्हापूर : ‘सनातन’ संघटनेवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समिती आणि समविचारी पक्ष संघटनांतर्फे शिवाजी चौकात रविवारी जोरदार निदर्शने करण्यात आली़ ‘सनातन’वर बंदी घातलीच पाहिजे, ‘आरएसएस’ चले जाव, मुख्यमंत्री जवाब दो, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली़ याप्रसंगी ‘सनातन’वर बंदी घालण्यासाठी एक लाख लोकांच्या सह्यांची मोहीम ज्येष्ठ नेते प्रा़ एऩ डी़ पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आली़ दुपारी चार वाजता निदर्शनास प्रारंभ झाला़ यावेळी ‘शहीद पानसरे अमर रहे, गोडसे प्रवृत्ती मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या़ पानसरे खूनप्रकरणी ‘सनातन’चा कार्यकर्ता समीर गायकवाड या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे़ गायकवाडला अटक होऊन आठवडा होत आला तरी या संघटनेबाबत मुख्यमंत्री भूमिका का जाहीर करत नाहीत याचे उत्तर द्यावे, असा सवालही निदर्शकांनी विचारला़ या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी ‘सनातन’वरील बंदीसाठी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर शेकडो पुरोगामी कार्यकर्त्यांनी सह्या केल्या़ या निदर्शनांत उदय नारकर, अतुल दिघे, एस़ बी़ पाटील, शिवाजीराव कदम, अनिल चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, प्राचार्य टी़ एस़ पाटील, सुभाष वाणी, सतीशचंद्र कांबळे, बाबूराव कदम, सुरेश शिपूरकर, नामदेव गावडे, मीना चव्हाण, मेघा पानसरे, प्रकाश ठाकूर, उमेश सूर्यवंशी, के. डी़ खुर्द, आशा कुकडे, सुवर्णा तळेकर, गिरीश फोंडे, उमेश पानसरे, विजय अकोळकर, रमेश वडणगेकर, आदींनी सहभाग घेतला़ ‘सनातन’वरील बंदीची मागणी पुरोगामी जनता करत आहे़ याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या संघटनेवरील बंदीबाबत आपली भूमिका मांडावी़ बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा़ पोलीस राष्ट्राचे सेवक आहेत़ पानसरेंप्रकरणी पोलीस करत असलेल्या तपासकामावर आमचा विश्वास आहे़ त्यांच्या तपासकामात राजकीय हस्तक्षेप केला जाऊ नय़े - एऩ डी़ पाटील, ज्येष्ठ नेते