शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

साहित्य संमेलनावरही ‘ओमिक्रॉन’चे सावट, निम्मी उपस्थिती, सात हजार रसिकांनाच परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 8:13 AM

Marathi Sahitya Sammelan, Nashik: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या चार दिवसांवर आले असताना, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्राॅनमुळे साहित्य संमेलनातील उपस्थिती ५० टक्क्यांवर आणावी लागणार आहे.

- धनंजय रिसोडकर नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या चार दिवसांवर आले असताना, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्राॅनमुळे साहित्य संमेलनातील उपस्थिती ५० टक्क्यांवर आणावी लागणार आहे. आता ७ हजार रसिकांचीच उपस्थिती बंधनकारक राहणार आहे.राज्य शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार बंदिस्त सभामंडपाच्या जागेतील संमेलनासाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम असल्याने, आता नाशिकच्या साहित्य संमेलनासाठीची उपस्थिती कमी राखण्यासह कोरोनासंबंधित सर्व प्रकारच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची कसरत आयोजकांना करावी लागणार आहे.

वर्षारंभी कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना, साहित्य संमेलनासाठी २६ ते २८ मार्च हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, मार्च महिन्यातच कोराेनाचा उद्रेक वाढू लागल्याने, संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. अखेरीस दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर संमेलन ३ ते ५ डिसेंबरदरम्यान घेण्याचे निश्चित करण्यात आले. आता संमेलन अवघ्या चार दिवसांवर आले असताना आणि मंडपात खुर्च्याही दाखल झालेल्या असताना शासन आदेशानुसार संमेलनातील उपस्थितीवर निर्बंधांचे सावट आहे. किमान नाशिकमध्ये तरी नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये, या दृष्टीने महापालिका, जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

संमेलनस्थळी रॅपिड अँटिजन चाचणी करणारसाहित्य संमेलनाच्या स्थळावर रॅपिड अँटिजन चाचणी करण्यासह प्रत्येकाला मास्क आणि  सॅनिटायझर देण्याचेही नियोजन आधीपासूनच करण्यात आले आहे. त्याशिवाय प्रत्येकाचे स्क्रिनिंग करण्याचेही नियोजन आयोजकांनी आधीपासून केले आहे. त्यामुळे निर्बंध वाढल्याने नियोजनात कोणताही मोठा फरक पडणार नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

मुख्य सभामंडपाची क्षमता १४ हजार आसन क्षमतेची आहे. मात्र, शासनाच्या आधीच्या नियमाप्रमाणे आम्ही आधीपासूनच निम्मे म्हणजे, ७ हजार खुर्च्यांचेच नियोजन केले होते. निर्बंधांचे धोरण असेल, त्याप्रमाणे अंतर राखून आसनव्यवस्था केली जाईल. - जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक