शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

राज्यात एमबीबीएसच्या वाढल्या ९७० जागा; सरसकट १० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 3:36 AM

३७३० जागांवर दिला जाणार प्रवेश

नागपूर : राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या ९७० वाढीव जागांना अखेर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) मंजुरी दिली. यामुळे आता राज्यात एमबीबीएसच्या २७६० वरून ३७३० जागा झाल्या आहेत. या जागा नव्याने लागू होणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्ल्युएस) कोट्यांतर्गत वाढविण्यात आल्या आहेत.वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) आणि आता एमबीबीएस (पदवी) प्रवेशाचा प्रश्न चिघळल्यानंतर अखेर सरकारने राज्यात एमबीबीएसच्या जागा वाढविण्याची मान्यता केंद्राकडून मिळविली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी १५ जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेऊन महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागासाठी काही प्रस्ताव सादर केले. त्यानंतर या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉक्टरांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्रातील शासकीय व खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार ‘एमसीआय’ने ‘ईडब्ल्युएस’ अंतर्गत एमबीबीएसच्या वाढविण्यात आलेल्या जागेचा मंजुरीचे पत्र ई-मेलवर शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना प्राप्त झाले. यात शासकीय व खासगी मिळून २० वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागांमध्ये सरसकट १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. १७ महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ५० जागांची वाढ करण्यात आली, तर सर्वाधिक ७० जागा जीएस. मेडिकल कॉलेज, मुंबईच्या वाढविण्यात आल्या. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या ३७३० जागांवर प्रवेश देण्याचा मार्ग खुला झाला आहे.आरक्षणासाठी शोधला पर्यायराज्य सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठ्यांना १६ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या विरोधात काही संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला चुकीचा ठरवत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतून मराठा आरक्षण गाळावे, असे निर्देश दिले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतरही सरकारने मराठा आरक्षणाचा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत समावेश करून अध्यादेश काढला होता. इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फटका न बसू देता मराठा आरक्षणातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठीच आता राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ९७० जागा वाढविण्यात आल्याची माहिती आहे.जागा वाढलेली महाविद्यालयेबी.जे.वैद्यकीय महा., पुणे (२५० जागा), डॉ. वैशंपायन स्मृती शा. वैद्यकीय महा., सोलापूर (२००), डॉ. शंकरराव चव्हाण शा. वैद्यकीय महा., नांदेड (१५०), शा. वैद्यकीय महा., अकोला (२००), शा. वैद्यकीय महा., औरंगाबाद (२००), शा. वैद्यकीय महा., चंद्रपूर (१५०), शा. वैद्यकीय महा., गोंदिया (१५०), शा. वैद्यकीय महा., जळगाव (१५०), शा. वैद्यकीय महा., मिरज (२००), शा. वैद्यकीय महा. नागपूर (२५०), ग्रॅण्ट वैद्यकीय महा. मुंबई (२५०), एच.बी.टी. वैद्यकीय महा. मुंबई (२००), इंदिरा गांधी शा. वैद्यकीय महा. नागपूर (२००), लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महा., मुंबई (२००), राजीव गांधी वैद्यकीय महा., ठाणे (८०), जीएस वैद्यकीय महा., मुंबई (२५०), वसंतराव नाईक शा. वैद्यकीय महा., यवतमाळ (२००), भाऊसाहेब हिरे शा. वैद्यकीय महा., धुळे (१५०), वैद्यकीय महा., आंबेजोगाई (१५०), टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महा., मुंबई (१५०).

टॅग्स :collegeमहाविद्यालयMedicalवैद्यकीय