ढाका : बांगलादेशात दोन दिवसांपूर्वी क्षमतेहून अधिक प्रवासी घेऊन जाणारी एक नौका बुडून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या शनिवारी 54 वर गेली. मदत आणि बचाव दलातील कर्मचा:यांना शनिवारी आणखी 25 मृतदेह सापडले. दरम्यान, अजून बेपत्ता प्रवाशांसाठी शोधमोहीम सुरू आहे.
राजधानी ढाकापासून नजीकच्या मुंशीगंज उपनगराच्या एका प्रशासकीय अधिका:यांनी सांगितले की, आतार्पयत आम्हाला 54 मृतदेह सापडले आहेत. अन्य मृतदेहांच्या शोधासाठी अभियान प्रगतीपथावर आहे. दरम्यान, गुरुवारी मेघना नदीत जोरदार हवेमुळे एमव्ही मिराज-4 जातीची एक नौका बुडाली होती. यात सुमारे 2क्क् प्रवाशी होते. यापैकी जवळपास 5क् प्रवाशी पोहून किना:यालगत येण्यात यशस्वी झाले. या नौकेची प्रवाशी क्षमता जवळपास 12क् एवढी होती.
गुरुवारी तिस:या दिवशीही बेपत्ता लोकांचा शोध सुरू असून मंगळवारी नव्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. बांगलादेश जहाज वाहतूक प्राधिकरणाने शोध अभियान बंद करण्याची तयारी सुरू असतानाच बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. शुक्रवारी रात्रभर चाललेल्या शोध अभियानात नौदल व तटरक्षक दलाच्या जवानांनी आणखी 25 मृतदेह ताब्यात घेतले. बुडालेल्या नौकेच्या सर्व बाजूंनी तपास केला असून ती नौका क्रेनने बाहेर काढण्यात आली आहे. आता यात मृतदेह सापडण्याची शक्यता मावळली आहे. तरीही पाणबुडय़ांना यात शोधमोहीम राबवण्याची परवानगी देण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
प्रवाशांचे शोकाकुल आप्तजन कडक उन्हातही नदीकिना:यावर ठाण मांडून आहेत. मदत कार्यात गती नसल्याबद्दल त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी आरोप केला की, ढाकाच्या सदरघाट तळावरून गुरुवारी ही जहाज शरीयतपूरसाठी रवाना झाली होती. यानंतर तासाभरातच क्षमतेहून अधिक प्रवाशी भरलेल्या या जहाजाला अपघात झाला. वारे जोरात वाहत असतानाही जहाजाच्या कॅप्टनने जहाज रोखली नाही. (वृत्तसंस्था)