आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:38 IST2026-04-05T11:33:43+5:302026-04-05T11:38:35+5:30

Solapur School: सोलापूरच्या चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेने निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा एक अप्रतिम संगम घडवून आणला आहे.

Now trees will talk, even reveal their identity! A unique experiment by a school in Solapur, what exactly is this? | आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?

आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?

लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर:
तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाची व्याप्ती आता केवळ पुस्तकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. याचाच प्रत्यय सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रात पाहायला मिळत आहे. चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजने निसर्ग आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम घडवून आणला आहे. शाळेच्या आवारातील झाडांवर 'क्यूआर कोड' लावून, झाडांशी संवाद साधण्याचा एक अभिनव मार्ग या प्रशालेने शोधला असून, हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचा हा एक वेगळा आणि प्रेरणादायी प्रयोग मानला जात आहे.

शालेय परिसरातील झाडांविषयीची सखोल माहिती आता प्रत्यक्ष झाडच सांगणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. शाळेच्या आवारात असलेल्या विविध वृक्षांवर विशिष्ट 'क्यूआर कोड' लावण्यात आले आहेत. कोणताही विद्यार्थी, पालक किंवा शाळेला भेट देणारा पाहुणा शाळेच्या आवारात असलेल्या विविध वृक्षांवर विशिष्ट ' क्यूआर कोड' लावण्यात आले आहेत.

आपल्या मोबाइलद्वारे हा कोड स्कॅन करताच, त्या झाडाची संपूर्ण माहिती मोबाइल स्क्रीनवर झळकते. हे क्यूआर कोड स्कॅन केल्यावर मिळणारी सर्व माहिती मातृभाषेत (मराठी) उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्यूआर कोड स्कॅन होताच झाडाचे प्रचलित मराठी नाव, इंग्रजी नाव आणि शास्त्रीय (बॉटनिकल) नाव, झाडाचे औषधी गुणधर्म आणि त्याचे पर्यावरणीय महत्त्व व हे झाड प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते आणि त्याचे वैशिष्टच काय आहे, हेही सांगते.

पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल केवळ आस्थाच निर्माण होणार नाही, तर त्यांना विज्ञानाची आणि अभ्यासाची गोडीही लागेल. केवळ पुस्तकात झाडांची चित्रे पाहण्यापेक्षा, प्रत्यक्षात समोर असलेल्या झाडाची डिजिटल माहिती मिळवणे हे विद्यार्थ्यांसाठी अधिक आकर्षक आणि स्मरणात राहणारे ठरत आहे. हा डिजिटल उपक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यावरणप्रेमी शिक्षक मुकुंद शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

Web Title : सोलापुर स्कूल नवाचार: अब पेड़ बोलेंगे, अपनी पहचान बताएंगे!

Web Summary : सोलापुर स्कूल ने पेड़ों पर क्यूआर कोड लगाए, मोबाइल से जानकारी उपलब्ध। विद्यार्थी, माता-पिता स्कैन करके मराठी नाम, गुण, आवास और पारिस्थितिक महत्व जान सकते हैं, जिससे पर्यावरण जागरूकता और वैज्ञानिक रुचि बढ़ेगी।

Web Title : Solapur school innovation: Trees now talk, revealing their identity!

Web Summary : Solapur school uses QR codes on trees, providing information via mobile. Students, parents can scan to learn Marathi names, properties, habitat, and ecological importance, fostering environmental awareness and scientific interest.