शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आता तटकरे एसीबीच्या रडारवर

By admin | Updated: June 17, 2015 03:11 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कोट्यवधींची संपत्ती उघडकीस आणणारा लाचलुचपत प्रतिबंधक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कोट्यवधींची संपत्ती उघडकीस आणणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय सुनील तटकरे यांच्याविरोधातील तपास येत्या तीन महिन्यांत पूर्ण करणार आहे. तशी हमी या विभागाने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.हा तपास सुरू असल्याचे पत्र या विभागाने न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर सादर केले. हा तपास येत्या तीन महिन्यांत पूर्ण केला जाईल, असेही या विभागाने स्पष्ट केले. तटकरे यांच्यावर शेतकऱ्यांचा भूखंड लाटल्याचा व महसूल बुडवल्याचा आरोप आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यानंतर तटकरे यांच्यावरील आरोपांत तथ्य आढळते की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणी भाजपाचे किरीट सोमैया यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे़ तटकरे यांनी स्वत:च्या व कुटुंबीयांच्या नावे ५१ कंपन्या काढून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या़ याने शासनाचा महसूल बुडाला आहे़ त्यामुळे याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सोमैया यांनी याचिकेत केली आहे़ ही याचिका २०१२ मध्ये दाखल झाली. त्यानंतर गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभाग व रायगड जिल्हाधिकारी यांनी तटकरे यांच्यावरील आरोपींच्या चौकशीचा अंतरिम अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानंतर एसीबीने या प्रकरणी तीन महिन्यांत तपास पूर्ण करण्याची हमी न्यायालयात दिली. (प्रतिनिधी)