शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आता एलिव्हेटेड प्रकल्प अंधेरी ते विरार

By admin | Updated: May 13, 2015 01:54 IST

बहुचर्चित असा चर्चगेट-विरार एलिव्हेटेड (उन्नत) प्रकल्प रेल्वे आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे रखडला आहे. आता हाच प्रकल्प अंधेरी ते

मुंबई : बहुचर्चित असा चर्चगेट-विरार एलिव्हेटेड (उन्नत) प्रकल्प रेल्वे आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे रखडला आहे. आता हाच प्रकल्प अंधेरी ते विरारपर्यंत पूर्ण करण्याचा विचार होत असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. यासाठी शासनासोबत बोलणीही सुरू आहेत. पश्चिम रेल्वे प्रवाशांना जादा लोकल आणि फेऱ्या उपलब्ध करण्यास चर्चगेट ते विरार असा एलिव्हेटेड प्रकल्प राबविण्यात येणार होता. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारमधील वादविवादामुळे हा एलिव्हेटेड प्रकल्प चांगलाच रेंगाळला. या प्रकल्पासाठी राज्य सरकारचीही जागा लागणार असल्याने त्यांचे सहकार्य आवश्यक होते. त्यासाठी राज्य सहकार्य करार होणे अपेक्षित होते. मात्र दीड वर्षात हा करार झाला नाही. अखेर काही महिन्यांपूर्वीच रेल्वे बोर्डाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून एलिव्हेटेड प्रकल्पासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली. त्यावर राज्य सरकारनेही सकारात्मक भूमिका घेतली. मात्र रेल्वेच्या चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला समांतर असा मेट्रो-३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्प असल्याने आणि एलिव्हेटेड प्रकल्पात जागाही बरीच जात असल्याने एलिव्हेटेड प्रकल्प अंधेरी ते विरार करण्याचा विचार राज्य सरकार आणि रेल्वेकडून केला जात आहे. यासंदर्भात एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारले असता, मुख्यमंत्र्यांसोबत रेल्वेमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा प्रकल्प अंधेरी ते विरार करण्याचा विचार पुढे आला होता. यावरच आता रेल्वेकडून विचार केला जात आहे.