शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

सातारा व पुणे जिल्हा बँकेला ‘ईडी’ने पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 9:52 AM

ED Sends Notice to Banks : जरंडेश्वर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणी ईडीकडून नोटीस.

ठळक मुद्देजरंडेश्वर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणी ईडीकडून नोटीस.

मुंबई : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याला कर्ज पुरवठा करणाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे.  

सातारा व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.  बँकेने ‘जरंडेश्वर’ला ९६ कोटी रुपयांचे कर्ज पुरविले होते. कारखान्याची ऐपत नसताना त्यांना हे कर्ज कशाच्या  आधारावर मंजूर करण्यात आले, त्यासाठी तारण काय घेण्यात आले, आदींबाबत सविस्तर तपशील  ईडीला हवा असल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र सहकारी बँकेच्या २५ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीने मागील आठवड्यात ६५ कोटी ७५ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यावर केलेल्या कारवाईचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटले होते. 

सातारा जिल्हा बँकेने कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या  जरंडेश्वर कारखान्याला ९६ कोटी कर्ज पुरविले होते. पुणे सहकारी  बँकेनेही काही कोटींचे कर्ज दिले होते, त्यांना कर्ज देताना कोणत्या आधारावर दिले, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचे पालन झाले होते का? याबाबत ईडी चौकशी करणार आहे. 

ईडीने दिलेल्या मुदतीपर्यंत जिल्हा बँकेला ईडीच्या नोटिसीला संचालक मंडळाला १० दिवसांत  उत्तर द्यावे लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जरंडेश्वरला  सातारा, पुणे बँकेसह चार बँकांनी कर्ज दिले आहे, त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्ज वाटपात काहीही चुकीचे केलेले नाहीजरंडेश्वर कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कर्ज वाटप केले आहे. हे कर्ज रीतसर दिलेले आहे. तसेच कर्जाची परतफेडदेखील वेळेत सुरू आहे. ईडीने नोटीस दिली नाही, तर कर्ज वाटपाबाबत माहिती मागवलेली आहे, आम्ही देणार आहोत.- डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPuneपुणेbankबँकSugar factoryसाखर कारखाने