शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

असुरक्षित 350 मधील 80 तलावांना पालिकेच्या नोटीसा

By admin | Updated: June 4, 2014 22:39 IST

शहरातील महापालिका , खासगी संस्था , तसेच वैयक्तिक मालकीच्या तलावांमधील तब्बल 60 टक्के तलाव पोहण्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

पुणे : शहरातील महापालिका , खासगी संस्था , तसेच वैयक्तिक मालकीच्या तलावांमधील तब्बल 60 टक्के तलाव पोहण्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. या तलावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. महापालिकेने जलतरण तलावांच्या सुरक्षेच्या तपासणीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. दरवर्षी उन्हाळयात शहरातील जलतरण तलावांवर नागरिक मोठया प्रमाणात गर्दी करतात. या तलावांच्या ठिकणी सुरक्षा साधनांचा अभाव असल्याने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे शहरातील अशा सर्व तलावांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने विशेष समिती नेमली होती. या समितीने तब्बल महिनाभर शहरातील सुमारे 350 तलावांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात 225 हून अधिक तलावांमध्ये सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचा अहवाल या समितीने सादर केला आहे. त्यातील 80 तलावांची सुरक्षा व्यवस्था अधिकच बिकट असून त्यांना तत्काळ सुधारणांसाठी नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. या सुरक्षा साधणांच्या अभावात प्रामुख्याने प्रशिक्षित जीव रक्षक नसणे, जीव रक्षणाचे साहित्य उपलब्ध नसणे, रेक्यू रिंग नसणे, तलावाच्या ठिकाणी जवळील रूग्णालयांचे क्रमांक तसेच इतर सुचना फलक न लावणे, अशा प्रकारच्या सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचे या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दोन तलाव तत्काळ बंद करण्याच्या सूचना या समितीच्या अहवालानुसार, हडपसर परिसरातील दोन जलतरण तलाव कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने तत्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, या दोन्ही तलावांना क्षेत्रीय कार्यालयांकडून नोटीस बजाविण्यात आली असून सात दिवसांच्या आत सुरक्षा मानकांची उपाय योजना न केल्यास हे तलाव पालिकेकडून सिल करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात या सुरक्षा साधनांसाठी महापालिकेकडून स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याचेही समितीमधील एका सदस्याने लोकमतशी बोलताना सांगितले.