शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ खिसे भरण्यासाठी नाही

By admin | Updated: May 4, 2015 01:34 IST

जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात येणारी जलसंधारणाची कामे अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी नाही, या योजनेतून गुणवत्तापूर्ण कामे अपेक्षित असून

नागपूर : जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात येणारी जलसंधारणाची कामे अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी नाही, या योजनेतून गुणवत्तापूर्ण कामे अपेक्षित असून प्रत्येक कामांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष असणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना बजावले.जलयुक्त शिवार योजनेच्या कार्यशाळेच्या समारोपात रविवारी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. फडणवीस यांनी योजनेचे महत्त्व पटवून देतानाच यातून नागपूर जिल्हा टंचाईमुक्त व्हावा आणि संपूर्ण देशासाठी नागपूरचे काम पथदर्शी ठरावे त्यादृष्टीने प्रयत्न करावा, असे आवाहन केले. ते म्हणाले की, जलसंधारणाची कामे म्हणजे खिसे भरण्याची संधी असे मानले जाते. मात्र ही योजना त्यासाठी नाही. आपण आकस्मिक भेट देऊन तेथील कामाची पाहणी करू, तसेच प्रत्येक कामांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नजर ठेवून कुठल्याही कामात गडबड होणार नाही याची काळजी घेऊ , असे फडणवीस म्हणाले. अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून कामे करावी ,असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)