शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
2
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
3
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
4
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
5
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
6
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
7
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
8
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
9
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
10
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
11
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
12
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
13
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
14
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
15
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
16
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
17
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
18
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
19
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
20
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले

नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत बँक गैरव्यवहाराची चौकशी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 06:04 IST

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा, सहकार विभागामार्फतही तपास 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नॉर्थ कॅनरा गौड स्वारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या गिरगाव शाखेतील यु. बी. इंजिनिअरींग कंपनीचे बंद केलेले खाते मुख्य वित्तीय अधिकारी यांच्या बनावट पत्राच्या आधारे उघडण्यात आले. सिग्नेटरी ॲथॉरिटीत बदल करून १.८३ कोटी रुपये इतरत्र वळविण्यात आले. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. तर, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सहकार विभागानेही याची स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश दिले.

आ. प्रसाद लाड यांनी सदर बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची लक्षवेधी सूचना मांडून या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी नाडकर्णी दाम्पत्यासह इतर काही व्यक्तींविरोधात एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत. यात काही पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग असून चौकशी होईपर्यंत पोलिस अधिकारी दीपक दळवी यांना निलंबित करण्याची मागणी आ. प्रवीण दरेकर यांनी केली. 

४७ प्रकरणांत फॉरेन्सिक ऑडिटराज्यमंत्री कदम यांनी उत्तर देताना सांगितले की, व्यवस्थापकीय संचालक, कर्मचारी आणि यू. बी. इंजिनिअरिंगचे मुख्य वित्तीय अधिकारी व इतर संबंधित यांनी संगनमत करून २०१८ ते २०२१ यादरम्यान हा घोटाळा केला. चौकशी करणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आर्थिक व्यवहार केल्याचा पुरावा आढळला नाही. मात्र, तक्रारीच्या चौकशीस योग्य दिशा दिली नसल्याने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

बँकेचे फ्रीज झालेले १.८३ कोटी रुपये अनधिकृतपणे डी-फ्रीज करून काढण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये ही बाबा उघड झाल्यावर बँकेने संपूर्ण रक्कम व्याजासहित परत केली. या गैरव्यवहारामुळे बँकेस ५० लाखांचा दंड झाला. बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक आणि त्यांची पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून  ४७ प्रकरणांत फॉरेन्सिक ऑडिट केले आहे. त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असे कदम म्हणाले.

टॅग्स :fraudधोकेबाजीYogesh Kadamयोगेश कदम