शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

मानसिक आधाराची कमतरता ठरतेय वाढत्या आत्महत्येस कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:52 IST

व्यक्तीला आलेले एकटेपण, मनाची कोंडी, घुसमटलेपणा, मित्र परिवार दुरावणे यामुळे आत्महत्या होत आहेत.

ठळक मुद्देआत्महत्या करु पाहणा-या २००० व्यक्तींना केले समुपदेशन १८ ते ४५ वयोगटाची संख्या सर्वाधिक प्रमाणापेक्षा जास्त ‘पर्सनल’’ होणे गंभीर आजाराचा वाढलेला मानसिक व शारीरिक ताण 

पुणे :  आता थोडं फार वाद व्हायचा अवकाश की त्याचा राईचा पर्वत करुन टोकाला जाण्याची मानसिकता वाढली आहे. अभ्यासाचा, परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होईल की नाही याबद्दलची भीती, नोकरीत सातत्य टिकविण्याचे आव्हान, वैयक्तिक नातेसंबंधात बदलत्या जीवनशैलीनुसार पडलेले अंतर याचा गंभीर परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होत आहे. यातून आत्महत्या करणा-यांची संख्या वाढु लागली आहे. आत्महत्या प्रतिबंधाच्या क्षेत्रात १३ वर्षांहून अधिक काळ काम करणा-या कनेक्टींग एनजीओ संस्थेच्या माहितीनुसार, या संस्थेने चालु वर्षी नोव्हेंबर अखेर तब्बल २००० आत्महत्या करु पाहणा-या व्यक्तींना समुपदेशन केले आहे. विशेषत: दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसते. याबरोबरच दिवाळी, ख्रिसमस या काळात देखील ’’विंटर सुसाईड’’ होत आहेत. याचे कारण म्हणजे सुट्टीच्या काळात आत्महत्येचे विचार मनात घोळत असलेल्या व्यक्तीला आलेले एकटेपण, मनाची कोंडी, घुसमटलेपणा, मित्र परिवार दुरावणे यामुळे आत्महत्या होत आहेत. व्यक्तीला आत्महत्येपासून रोखण्याकरिता त्यांचे समुपदेशन करणा-या सुसाईड प्रिव्हेंंशन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी १६०० व्यक्तींना समुपदेशन करण्यात आले. २०१६ मध्ये ती संख्या ३०००इतकी होती. तर यावर्षी हा आकडा २००० इतका आहे. याविषयी माहिती देताना  संस्थेचे समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी सांगितले, केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून समुपदेशनाकरिता फोन येतात. त्या तुलनेने महाराष्ट्रातून येणारे कॉल सर्वाधिक आहेत. यात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद यासारख्या ग्रामीण भागांतून फोन येणा-यांची संख्या लक्षणीय आहे. ज्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत अशा व्यक्तीला केवळ सल्ला आणि मार्गदर्शन न करता तिला तिच्या स्व क्षमतांची ओळख करुन देण्यावर भर दिला जातो. कुठल्या समस्येमुळे विद्यार्थी, महिला, नोकरदार व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांच्या मनात नैराश्य आले आहे त्यांना त्या समस्येचे उत्तर शोधण्याकरिता मदत केली जाते. याबरोबर संबंधित व्यक्तीला एखाद्या मनोविकार तज्ञांचा संदर्भ देखील दिला जातो. विशेष म्हणजे मानसिक आरोग्याचा समतोल ढासळलेल्या व्यक्तीच्या सहमती विचारात घेतली जाते.  ...................* प्रमाणापेक्षा जास्त ‘पर्सनल’’ होणे गंभीर मुळातच छोट्या छोट्या कारणामुळे मनात दुस-याविषयी अढी धरुन बसल्याने व्देषाची भावना वाढते. मोक ळेपणाने संवाद साधणे, दिलखुलासपणे एखाद्याशी गप्पा मारणे, हसत खेळत प्रसंगाला सामोरे जाणे, अशी सकारात्मकता मनात न बाळगता सध्या कुठलेही कारण प्रमाणापेक्षा जास्त ‘‘पर्सनल’’ घेणे मानसिक स्वास्थ्याकरिता धोकादायक ठरत आहे. तसेच ज्यावेळी मानसिक आधाराची गरज असते अशाप्रसंगी तो न मिळाल्याने ‘‘टनेल व्हीजन’’सारख्या अवस्थेला सामोरे जावे लागत असल्याचे पवार यांनी सांगितले. .....................*वयोगटानुसार बदलतात आत्महत्येची कारणे १८ ते २५  -  अभ्यासाचा, परीक्षेचा ताण, परीक्षेच्यावेळी प्रचंड मेहनत घेऊनही अपयश येणे, वैयक्तिक नातेसंबंधात येणारी क टुता (विशेषत: प्रेमभंग, एकतर्फी प्रेमाची उदाहरणे, पालकांकडून दाखविला जाणारा अविश्वास, मैत्रीत संवादाचा अभाव) ३० ते ४० - व्यापार-उद्योगात येणा-या आर्थिक  अडचणी, नातेसंबंधातील भांडणे (नवरा -बायको वाद), नोक-यांमधील सात्यत्य टिकविण्यात येणारे अपयश, घरातील व्यक्तीं सोबत संवाद टिकविण्यात येणारे अपयश, दुर्धर आजाराचा वाढलेला मानसिक व शारीरिक ताण ४० च्या पुढे - घरातील व्यक्तींबरोबर संवादाचा अभाव, मनात सातत्याने तयार होणारी दुर्लक्षितपणाची भावना, मुलांकडून होणारा मानसिक व शाररीक छळ, अपयशाची मनात बसलेली भीती, दीर्घकाळचे आजारपण.. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूHealthआरोग्यMeditationसाधना