अजित पवार यांची 'शिरूर'साठी आवश्यकता नाही; का म्हणाले असे शरद पवार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 19:12 IST2019-02-08T17:30:56+5:302019-02-08T19:12:49+5:30

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांसोबत बातचीत करताना अजित पवार यांच्या शिरूरच्या विधानावर भाष्य केले.

No need of Ajit Pawar's contest in Shirur loksabha Constituency : Sharad Pawar | अजित पवार यांची 'शिरूर'साठी आवश्यकता नाही; का म्हणाले असे शरद पवार...

अजित पवार यांची 'शिरूर'साठी आवश्यकता नाही; का म्हणाले असे शरद पवार...

पुणे : शिरूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याच्या अजित पवार यांच्या इच्छेला खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लगाम लावला आहे. यामुळे अजित पवार यांची दिल्लीवारी अद्याप दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांसोबत बातचीत करताना अजित पवार यांच्या शिरूरच्या विधानावर भाष्य केले. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव खासदार आलेल्या शिरूर मतदारसंघात लढण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले होते. 

राष्ट्रवादीला मोठ्ठी 'पॉवर'; शरद पवार उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

 

त्यावर पवार यांनी बोलताना शिरूरमधून अजित पवार यांनी लढण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे अजून पाच ते सहा दावेदार असल्याचे सांगून या मुद्द्याची हवाच काढून घेतल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Web Title: No need of Ajit Pawar's contest in Shirur loksabha Constituency : Sharad Pawar