अकोला : केंद्रीय भूपुष्ठ वाहतूक मंत्री नीतीन गडकरी ३१ ऑक्टोबरला अकोल्याच्या दौर्यावर येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, तसेच नव्याने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या अकोला ते संगारेड्डी (तेलगंण) आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाची मागणी होत असलेल्या अकोला ते बैतूल (मध्य प्रदेश) या मार्गांच्या चौपदरीकरणासह अकोला शहरातील अशोक वाटिका चौक ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या उड्डाण पुलाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अमरावती ते नवेगाव (गुजरात) या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम २0११ मध्ये प्रस्तावित करण्यात आले होते. या कामास लवकरच तीन टप्प्यात प्रारंभ होणार आहे. यासोबतच अकोला ते वाशिम ते तेलंगणमधील संगारेड्डीपर्यंतच्या, नव्याने राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जा मिळालेल्या मार्गाच्या चौपदरीकरणालाही सुरुवात केली जाईल. याशिवाय अकोला ते आकोटमार्गे मध्य प्रदेशमधील बैतुलपर्यंतच्या मार्गासही राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्याची मागणी भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून होत आहे. शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंत उड्डाण पूल प्रस्तावित करण्यात आला असून, यासर्व विकास कामांचे नारळ फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३१ ऑक्टोबर रोजी शहरात दाखल होतील. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे दळणवळणाची मोठी समस्या निकाली निघणार असल्याचा विश्वास खासदार संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर यांनी व्यक्त केल्याचे प्रसिद्धिप्रमुख गिरीश जोशी यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
नितीन गडकरी ३१ ऑक्टोबरला अकोल्यात
By admin | Updated: October 3, 2015 02:38 IST
उड्डाण पुलासह महामार्गाच्या चौपदरीकरणाचा होणार शुभारंभ.
नितीन गडकरी ३१ ऑक्टोबरला अकोल्यात
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}