आई महोत्सवात नऊ मातांचा गौरव

By Admin | Updated: June 29, 2016 03:04 IST2016-06-29T03:04:34+5:302016-06-29T03:04:34+5:30

‘रोटरी क्लब आॅफ डोंबिवली डाउन टाउन’ व ‘पॉल पेरापिल्ली परिवारा’तर्फे रिटा पॉल यांच्या स्मरणार्थ नुकताच आई महोत्सव घेण्यात आला.

Nine Mothers' Glory at the Mother Festival | आई महोत्सवात नऊ मातांचा गौरव

आई महोत्सवात नऊ मातांचा गौरव


डोंबिवली : ‘रोटरी क्लब आॅफ डोंबिवली डाउन टाउन’ व ‘पॉल पेरापिल्ली परिवारा’तर्फे रिटा पॉल यांच्या स्मरणार्थ नुकताच आई महोत्सव घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रतिकू ल परिस्थितीत मुलांना वाढवलेल्या नऊ मातांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. अरुण पाटील यांची संकल्पनेतून हा महोत्सव सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झाला. त्यात सीमा कुलकर्णी, औरंगाबादमधील निर्मला जोशी, अनिता नलावडे, नीता देवळालकर, काशीबाई वायले, नंदा ढोनुष्के, पुष्पा गवळी, नलिनी वानखेडे, व अहमदनगरच्या मंदाकिनी काळोखे या नऊ आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला. माजी पोलीस आयुक्त भुजंगराव मोहिते, पॉल पेरापिल्ली, निखित धूत यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्हाबरोबर साडी, डॉ. पाटील यांचे ‘वाचाल तर वाचाल’ हे पुस्तक, ज्योती साठवणे यांच्यातर्फे ‘गोलघुमट’ पुस्तक, पापरी भौमिकतर्फे भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या.
आईच्या त्यागाबद्दल नवीन पिढी असंवदेनशील होत आहे. असे असतानाच आईचे कर्तृत्व समाजापुढे आणण्याचे सकारात्मक कार्य हा क्लब करत आहे, असे मत मोहिते यांनी व्यक्त केले. माधुरी वानखेडे यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘हास्यदरबार’ या कार्यक्रमातून जगभरातील रसिकांनी हसवणारे दिलीप खन्ना यांनी कार्यक्रमात रंगत आणली. डॉमनिक जॉन, योगेश झांबरे, प्रमोद रेमणे,अशोक पगारे यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पाटील यांनी केले. राहुल बोस यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
>पाच हजारांची मदत : आदिवासी मुलांसाठी कार्य करणाऱ्या संजीवनी आदिवासी गु्रपसाठी निर्मला जोशी यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला. तो त्यांनी डॉ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

Web Title: Nine Mothers' Glory at the Mother Festival