शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पाचे लोकार्पण ६ ला

By admin | Updated: January 4, 2015 01:00 IST

साऱ्या जगाची वार्ता दररोज आपल्या घरी पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या कष्टाला सलाम करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता

लोकमत साकारणार देशातील पहिले शिल्प : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा नागपूर : साऱ्या जगाची वार्ता दररोज आपल्या घरी पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या कष्टाला सलाम करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पाचे’ लोकार्पण दि. ६ जानेवारीला नागपूर येथे करण्यात येत आहे.स्थानिक संविधान चौक (रिझर्व्ह बँकेजवळ) येथे हे शिल्प उभारण्यात आले आहे. याच ठिकाणी सायंकाळी ५ वाजता हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते या शिल्पाचे लोकार्पण करण्यात येईल. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्याम वर्धने उपस्थित राहतील. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. हे शिल्प साकारणारे मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार किरण अदाते हेही याप्रसंगी उपस्थित राहतील.ऊन, पाऊस असो वा थंडी-वारा, सकाळी आपल्या घरी पहिली भेट होते ती वृत्तपत्र विक्रेता बंधूशी. जगभरातील माहितीचे वहन करण्याचे काम वृत्तपत्र विक्रेता बंधू न थकता करीत आला आहे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी वृत्तपत्रांच्या खांद्याला खांदा लावून प्रवास करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी देशातील वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांचे प्रतीक म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने हे शिल्प देशाच्या हृदयस्थळी, झिरो माईल्सजवळ संविधान चौकात उभारण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)