शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 05:55 IST

विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीच वापरली जाणार, नवमतदारांना संधी नाही !

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी निश्चित करण्यात आलेली मतदार यादीच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी वापरली जाण्याची शक्यता असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही अशी सद्य:स्थिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असून, त्यासाठीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. राज्य आयोग या निवडणुकीसाठी मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (मुख्य निवडणूक अधिकारी) मंत्रालयातील कार्यालयातून घेत असते. त्यानुसार राज्य आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणलेली मतदार यादी ही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पत्राद्वारे मागितली आहे. त्याच यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील, हे लक्षात घेता विधानसभा निवडणुकीपासून नंतरच्या काळात ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली असेल त्यांना मतदान करता येणार नाही.

सूत्रांनी सांगितले की, आधीच्या काळातही तसे घडलेले आहे. त्याशिवाय या निवडणुकांसाठी आवश्यक असणाऱ्या ईव्हीएम मशीनची मागणीही राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. राज्य आयोगाला सहकार्य करण्याचीच आमची भूमिका असेल, आम्ही लवकरच विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी त्यांच्याकडे सुपूर्द करू, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

विधानसभा निवडणुकीनंतर ७ लाख नवमतदारांची नोंदणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेष रस असलेले राजकीय पक्ष आणि या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते हे ‘आपल्या’ मतदारांची नोंदणी करवून घेत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास सात लाख नवमतदारांची नोंदणी झाल्याचे समजते. मात्र विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदार याद्याच याही निवडणुकांत वापरण्यात येतील असा अंतिम निर्णय झाल्यास हे नवमतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. तसेच, ‘आपले’ मतदार वाढविण्यासाठी उत्साहात असलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होण्याचीही शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोग विधानसभा मतदार याद्यांनुसारच मतदानावर ठाम राहिले, तर काही राजकीय पक्ष हे नवमतदारांनाही मतदानाचा हक्क द्या यासाठी राज्य आयोगावर दबाव आणण्याची शक्यता आहे.

यादीत राज्य आयोग बदल करू शकत नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असते. मात्र, मतदार यादीमध्ये मतदार नव्याने जोडण्याचा अधिकार त्यांना नसतो. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेल्या यादीमध्ये ते बदल करू शकत नाहीत.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Votingमतदान