शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नीला सत्यनारायण यांच्या मनातील 'घुसमट' आली समोर; लॉकडाऊन काळात लिहीत होत्या 'डायरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 12:42 IST

निधनाआधी सोशल मीडियावर गुरुवारी केले होते या डायरीचे पहिले पान शेअर...

पुणे : घरात एक मतिमंद मुलगा. तो सैरभैर झालेला. त्याला कळत नाही आजूबाजूला काय चाललं आहे, का चाललं आहे. त्याला रोज फिरायची सवय आहे. ती त्याची गरज आहे.त्याला मी समजावू शकत नाही. मला फार हताश वाटतं. आपण एकमेकांशी बोलतो. मित्रांना फोन करतो. त्याने काय करावं. त्याची घुसमट कुणाला समजणार आहे? हे भावनिक बोल आहेत राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे. लॉकडाऊनच्या काळातील आयुष्यावर प्रकाशझोत टाकणा-या 'लॉकडाऊन डायरी' चे हे पहिले पान त्यांनी मुलाला केंद्रस्थानी ठेवून 6 जुलै ला सोशल मीडियावर शेअर केले होते. गुरुवारी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि आता ही डायरी अपूर्णच राहिली.

     राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कार्यरत असताना वेळप्रसंगी कणखर भूमिका घेतलेल्या  नीला सत्यनारायण यांच्या मातृत्वाचा एक हळवा कोपरा या शब्दांमधून  प्रतीत झाला आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच  लॉकडाऊनच्या काळात सामना कराव्या लागणाऱ्या अडचणींना त्यांनी लेखणीतून वाट मोकळी करून दिली होती. ' लॉकडाऊन डायरी' मधून त्यांनी विशेष मुलाच्या भावनिक घुसमटीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आहे  अशा आशयाचे मुखपृष्ठ त्यांनी त्या डायरीच्या पहिल्या पानाला जोडले होते. त्यामध्ये 'जवळ जवळ तीन महिने झाले लॉकडाऊनला. आधी भाजीपाला मिळायचा. वाण सामानही मिळायचं. आता तेही मिळेनास झालं आहे. कोणाकोणाला विनंती करून हे सामान मागवलं. दूर जायचं म्हटलं तर गाडी हवी.बस तर बंदच आहे. बाहेर जायचं म्हटलं तर पोलिसांची भीती. ते आपला अपमान करतील.गाडी जप्त करतील याची धास्ती. अशा शब्दातून त्यांनी लॉकडाऊनमधील सामान्य माणसाचे जगणेही मांडले होते. मात्र त्यांच्या निधनाने ही डायरी आता अपूर्णच राहिली...याची सल अनेकांना जाणवत आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूSocial Mediaसोशल मीडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या