शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पाटील यांच्या मुलाला मारहाण

By admin | Updated: July 28, 2014 01:34 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजय पाटील यांचा मुलगा शुभंकर पाटील याला मारहाण झाल्याची घटना रविवारी घडली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाजवळ सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

पाटील-आर्य यांच्यात जुंपली : पोलिसांत तक्रार दाखलनागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजय पाटील यांचा मुलगा शुभंकर पाटील याला मारहाण झाल्याची घटना रविवारी घडली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाजवळ सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. रविवारी देशपांडे सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा संपल्यानंतर शुभंकर पाटील सभागृहातून बाहेर पडला असता अचानक काही तरुणांनी त्याच्याशी वाद सुरू केला व शैलेंद्र तिवारी नावाच्या तरुणाने त्याला मारहाण केली. सोबतच जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. यानंतर उपस्थितांनी मध्यस्थी केल्यानंतर तरुण पळून गेले. शुभंकर पाटील याने दिलेल्या तक्रारीवरुन सीताबर्डी पोलीस ठाण्यात कलम ३२३,५०६ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपमाझ्या मुलाला मारहाण करण्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय पाटील यांनी केला आहे. विरोधी गटाचे हे षड्यंत्र होते व यामागे आर्य हेच आहेत असे पाटील म्हणाले. तर वेदप्रकाश आर्य यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. अजय पाटील यांनी चुकीचे आरोप केले असून त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.