प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

By Admin | Updated: June 3, 2014 01:24 IST2014-06-03T01:24:35+5:302014-06-03T01:24:35+5:30

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

NCP's candidature for Praful Patel | प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

>मुंबई : माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राष्ट्रवादी भवनात झालेल्या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
माजी केंद्रीय राज्यमंत्री तारिक अन्वर हे लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठीची निवडणूक 19 जूनला होणार आहे. त्यासाठी येत्या गुरुवारी 5 जूनला सकाळी 1क् वाजता पटेल विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पवार यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले पटेल हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तथापि, राज्यसभेच्या माध्यमातून त्यांची संसदीय कारकीर्द सुरू राहणार आहे. 
                                          (विशेष प्रतिनिधी) 

Web Title: NCP's candidature for Praful Patel