शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच देईल राज्याला दिशा

By admin | Updated: August 18, 2014 03:58 IST

खोटे बोलायचे आणि ते रेटून बोलायचे हा केवळ एकमेव धंदा सध्या विरोधकांचा आहे. अनेक लाटा येतील

महाड : खोटे बोलायचे आणि ते रेटून बोलायचे हा केवळ एकमेव धंदा सध्या विरोधकांचा आहे. अनेक लाटा येतील आणि जातील, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दिशा देण्याची धमक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असल्याने येत्या विधानसभेतही पुन्हा राज्यात सत्तेवर येण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणगाव येथे आज झालेल्या निर्धार मेळाव्यात केला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रायगडचे पालकमंत्री सचिन अहिर, आ. अनिल तटकरे, आ. सुरेश लाड, प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव, सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे आदी उपस्थित होते.पवार पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील अपयशाने कार्यकर्त्यांनी नाउमेद होण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे तसेच आघाडी सरकारने घेतलेल्या महत्त्वाकांक्षी योजना व निर्णयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण राज्यभरात निर्धार मेळाव्यांचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोकणाला कायम झुकते माप दिले आहे. अर्थमंत्री म्हणून काम करताना सुनील तटकरे यांनीही कोकण विकासासाठी अनेक योजनांची घोषणा करून त्यांची आज प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत आहे. इतकी विकासकामे करूनही मतदार मते देत नसतील तर ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल. आघाडी सरकारने अन्य कुठल्या जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आदिवासी समाजाच्या आरक्षणालाही धक्का न लावता धनगर समाजालाही आरक्षण देण्याबाबतची शिफारस राज्य शासन करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट करतानाच मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत राहिलेल्या काही त्रुटी दुरुस्त करण्याचे आश्वासनही पवार यांनी या वेळी दिले. आघाडी शासनाने घेतलेल्या निर्णयाची व विविध योजनांची माहिती पवार यांनी या वेळी दिली. या योजनांबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जनजागृती करावी, असे आवाहन पवार यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना केले. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची तो निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील; पण या ठिकाणी दिलेल्या उमेदवारीवरून कोणीही नाराजी व्यक्त करून कृती केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही पवार यांनी या वेळी दिला. (वार्ताहर)