दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 16:47 IST2026-02-18T16:45:10+5:302026-02-18T16:47:46+5:30

NCP SP MP Supriya Sule News: आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केले नाही. रोहित अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

ncp sp group mp supriya sule reaction on are praful patel and sunil tatkare hindering the merger of both ncp party | दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

NCP SP MP Supriya Sule News: अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. आम्हाला राजकारण करायचे नाही. आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. हा राजकारणाचा विषय नाही. दादा गेल्याने आम्ही सर्वच भावनिक आहोत. जगात माणुसकी उरली आहे की नाही. दादा गेल्यावर अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही आता पुढे पाहत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केले नाही. आम्ही या देशाचे, राज्याचे सेवक आहोत. लोकांनी आम्हाला निवडून दिले. आमचे मुख्य ध्येय काय आहे, तर लोकांची काम करावी. मतदारसंघाचा विकास करावा. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. रोहितची अस्वस्थता ही सहाजिक आहे. रोहित सातत्याने ती उत्तरे शोधत आहे. आमच्या घरात जे झाले, ते कुणाच्याही घरात होऊ नये हाच विचार आहे. चौकशी पारदर्शक झाली पाहिजे, ही तमाम महाराष्ट्राची मागणी आहे. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल असे मला वाटते, असेही त्या म्हणाल्या. 

दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामुळे अडथळा येत आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना, हात जोडत सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी असे म्हटले. आज माझा भाऊ नाही. माझा दादा मोकळ्या मनाचा होता, ते ऑफ दि रेकॉर्ड पत्रकारांशी बोलले आहेत. त्यामुळे या विषयावर मी काय बोलू? ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहणार आहे. आता कुणासोबत काय खोटे करायचे, जे खरे आहे ते सर्वांना माहिती आहे. कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

दरम्यान, शरद पवार हे पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार का, यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात महाविकास आघाडीचे घटक पक्ष पुढील ८ ते १० दिवसात निर्णय घेतील. विमान अपघातासंदर्भात उद्धवसेना आणि काँग्रेसने संसदेत चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्र असू. लवकरच महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यात पुढील निर्णय होईल.

 

Web Title : क्या NCP विलय में पटेल और तटकरे बाधक? सुप्रिया सुले का संकेत।

Web Summary : अजित पवार के निधन के बाद रोहित पवार की चिंताओं को सुप्रिया सुले ने संबोधित किया और जांच में पारदर्शिता पर जोर दिया। सुले ने प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे के कारण एनसीपी विलय में संभावित बाधाओं का संकेत दिया और अपने दिवंगत भाई की स्पष्ट टिप्पणियों पर ध्यान दिया। पवार के राज्यसभा चुनाव पर एमवीए जल्द फैसला लेगा।

Web Title : Stalemate in NCP merger? Supriya Sule hints at Patel, Tatkare hurdle.

Web Summary : Supriya Sule addressed Rohit Pawar's concerns after Ajit Pawar's tragic death, emphasizing transparency in the investigation. Sule hinted at potential obstacles in the NCP merger due to Praful Patel and Sunil Tatkare, deferring to her late brother's candid remarks. MVA will decide on Pawar's Rajya Sabha bid soon.