राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच प्रगती पुस्तक, दिला असा शेरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 03:25 PM2023-02-17T15:25:43+5:302023-02-17T15:26:16+5:30

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रातून माघारी जाणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं प्रगती पुस्तक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. 

NCP released Governor Bhagat Singh Koshyari's Pragati book, gave a comment | राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच प्रगती पुस्तक, दिला असा शेरा 

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच प्रगती पुस्तक, दिला असा शेरा 

googlenewsNext

विविध वादग्रस्त विधाने, राजकीय निर्णय आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या अपमानकारक वक्तव्यांमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, चौफेर टीकेनंतर भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेला राजीनामा मंजूर करून त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून माघारी जाणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं प्रगती पुस्तक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. तसेच हे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्र भाजपाला टॅग केले आहे. 

हे प्रगती पुस्तक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्याला प्रगती शब्दावर काट मारून अधोगती पुस्तक असं नाव देण्यात आलं आहे. तसेच राज्यपालांच्या नावाचा उल्लेख भगतसिंह श्यारी असा करून ते व्हॉट्सअॅप विद्यालयातील ढ तुकडीमधील असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्यांना इतिहास या विषयात शून्य गुण असल्याचे लिहून त्यांना टोला लगावण्यात आला आहे. त्याबरोबरच सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची सवय आहे. या विद्यार्थ्याची वर्तणुक पाहता याची बालवाडीपासून सुरुवात करण्याची गरज आहे असा शेरा देण्यात आला आहे. 

सोबतच एक पत्रही जोडण्यात आले आहे. त्या पत्रामधूनही कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेच कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे सदरहू विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्यांने केले आहे. तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी, ही विनंती, असे या पत्रात म्हटले आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पत्रप्रपंचामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची गरज आहे. 

Web Title: NCP released Governor Bhagat Singh Koshyari's Pragati book, gave a comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.