राष्ट्रवादीने वाढविले काँग्रेसचे ठोके !

By Admin | Updated: August 19, 2014 00:52 IST2014-08-19T00:52:27+5:302014-08-19T00:52:27+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत नागपूर शहरात राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही जागा नाही. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून दावेदारी अर्ज स्वीकारले जात आहेत.

NCP raises Congress' clash | राष्ट्रवादीने वाढविले काँग्रेसचे ठोके !

राष्ट्रवादीने वाढविले काँग्रेसचे ठोके !

उपराजधानीत ३६ जणांचे अर्ज : मुंबईला होणार मुलाखती
नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत नागपूर शहरात राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही जागा नाही. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून दावेदारी अर्ज स्वीकारले जात आहेत. शहरातील सहा जागांसाठी राष्ट्रवादीच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे.
सर्वाधिक अर्ज पश्चिम नागपूरच्या जागेसाठी आले आहेत. यात सलील देशमुख यांच्यासह शहर अध्यक्ष अजय पाटील, नगरसेविका प्रगती अजय पाटील, वेदप्रकाश आर्य, विजय तालेवार, गंगाप्रसाद ग्वालबंशी व योगेश मेश्राम आदींचा समावेश आहे.
पूर्व नागपुरातून नगरसेवक दुनेश्वर पेठे व पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, दक्षिणमधून सुनील राऊ त, नगरसेवक राजू नागुलवार, उत्तर मतदारसंघात रमेश फुले, महेंद्र भांगे, शरद नागदिवे तर मध्य नागपूर मतदारसंघावर रमण ठवकर, अनिल अहिरकर, योगेश कुंभलकर व बबीता मेहर आदींनी दावा केला आहे.
बुधवारपर्यंत इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार असून, त्याच दिवशी पक्षाच्या प्रदेश कमिटीकडे पाठविले जाणार असल्याची माहिती अजय पाटील यांनी दिली. इच्छुकांच्या मुंबईला मुलाखती होतील. परंतु आघाडी कायम राहिली तर पक्षाच्या वाट्याला येतील त्याच जागा लढवाव्या लागतील. आघाडी न झाल्यास सर्व जागांची लढविण्याची पक्षाची तयारी असल्याचे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP raises Congress' clash