Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 15:23 IST2020-05-10T15:20:47+5:302020-05-10T15:23:11+5:30
Vidhan Parishad Election: विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या नऊ जागांसाठीची २१ मे रोजी होणारी ही निवडणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढणार आहेत.

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी
मुंबई : येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दोन जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी आज याची घोषणा केली.
विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या नऊ जागांसाठीची २१ मे रोजी होणारी ही निवडणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे ती बिनविरोध व्हावी असे प्रयत्न सुरु असताना काँग्रेसच्या भूमिकेमुळे मात्र निवडणूक बिनविरोध होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपला चार, शिवसेनेला दोन राष्ट्रवादीला दोन आणि काँग्रेसला एक जागा अशी वाटणी करून ही निवडणूक बिनविरोध केली जाईल असे म्हटले जात आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करून राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री असल्याचे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
श्री. शशिकांत शिंदे, सातारा व श्री. अमोल मिटकरी, अकोला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे.@shindespeaks@amolmitkari22
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 10, 2020