शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

धनंजय मुंडे प्रकरण : "आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं"

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 13, 2021 20:17 IST

मुंडे यांनी स्वतःच मंगळवारी (12 जानेवारी) फेसबुकवर संबंधित महिलेसोबतच्या आपल्या संबंधांची कबुली दिली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे.

सांगली -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यासंदर्भात, मुंडे यांनी स्वतःच मंगळवारी (12 जानेवारी) फेसबुकवर संबंधित महिलेसोबतच्या आपल्या संबंधांची कबुली दिली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडें यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हे म्हणाले, "राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक, आमच्याकडून जेवढ्या नैतिकतेची अपेक्षा करत आहेत, तेवढी नैतिकता त्यांनी सत्तेत असाताना पाळली होती का? विरोधकांनी आधी स्वत:ला आरशात पाहावे." कोल्हे यांनी असे विधान करत अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांची पाठराखणच केली आहे.

हे आम्हाला शिवभक्ती शिकवणार आहेत का? -औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरूनही कोल्हे यांनी भाजपला सुनावले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा कोण उचलत आहे, हे बघून मला अप्रुप वाटते. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवले, ज्यांनी महाराजांच्या गडकोटावर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जीआर काढला, हे आम्हाला शिवभक्ती शिकवणार आहेत का? असा खोचक सवालही कोल्हे यांनी यावेळी केला.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप अतिशय गंभीर - गायिका रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. तिने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. त्यातून सत्य समोर येईल. मात्र त्याआधी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. ते राजीनामा देण्यास तयार नसतील, तर सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगायला हवे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

पवार अतिशय नैतिकपणे राजकारण करतात, ते योग्य निर्णय घेतील -धनंजय मुंडेंनी संवेदनशीलपणे निर्णय घ्यायला हवा. अन्यथा लोकांचा आवाज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू. धनंजय मुंडे यांच्या हातून चूक घडली आहे. माणसाच्या हातून चुका होत असतात. पण राजकारणाचे काही नियम आहेत. त्यात मुंडेंची चूक बसत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अतिशय नैतिकपणे राजकारण करतात. आतापर्यंत त्यांनी शुद्ध राजकारण केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ते योग्य निर्णय घेतील, असं पाटील यांनी पुढे म्हटलं. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा