दिल्लीप्रमाणे मुंबईतही दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती : आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:58 IST2020-03-01T15:43:41+5:302020-03-01T15:58:42+5:30
कुठल्याही बाजूने यश मिळत नसल्याने भाजप सरकार आपला चेहरा झाकण्यासाठी जातीय दंगल घडवत आहे.

दिल्लीप्रमाणे मुंबईतही दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती : आव्हाड
मुंबई : दिल्ली आणि मुंबईत राडा झाला म्हणजे देश संपला. दिल्लीत ज्याप्रमाणे दंगली घडल्या त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती, मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याने भाजपला हे शक्य झालं नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.
या देशाचं राजकरण धर्मद्वेषाच्या माध्यमातून आपल्या ताब्यात ठेवायचं काम भाजप करू पाहतेय, हे दिल्लीच्या दंगलीवरून स्पष्ट होत आहे. दिल्लीच्या दंगलीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी एकही शब्द न काढणे, म्हणजेचं क्रूरतेची परिसीमा आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी हेच 'दिल्ली पॅटर्न' देशभरात चालवणार असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दिल्लीप्रमाणे मुंबईतही दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती ; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप pic.twitter.com/vYYx3pkaK8
— Lokmat (@MiLOKMAT) March 1, 2020
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, देशात बेरोजगारी वाढली असून आर्थिक घसरण थांबता थांबत नाही. कुठल्याही बाजूने यश मिळत नसल्याने भाजप सरकार आपला चेहरा झाकण्यासाठी जातीय दंगल घडवत आहे. गुजरातमध्ये 2002 ज्या प्रमाणे दंगल घडवण्यात आली होती, तेच मॉडेल आता दिल्लीत पाहायला मिळत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.